घरटेक-वेकदमदार बॅटरी असलेला रेडमी नोट ९ आणि रेडमी नोट ९ प्रो लाँच

दमदार बॅटरी असलेला रेडमी नोट ९ आणि रेडमी नोट ९ प्रो लाँच

Subscribe

चीनी स्मार्टफोन उत्पादक शाओमीने आज आपली रेडमी नोट ९ सीरीज जागतिक स्तरावर बाजारात आणली. Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. तथापि, कंपनीने यापूर्वीच या सीरीजमधील Redmi Note 9s लाँच केला आहे. गेल्या महिन्यात Redmi Note 9 Pro भारतात लाँच करण्यात आला होता. कंपनीने आता हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर बाजारात आणला आहे. Redmi Note 9 कंपनीने जागतिक स्तरावर आणला आहे. हा लवकरच भारतातही लाँच होणार आहे. Redmi Note 9, Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9s या तीनही स्मार्टफोनमध्ये 5,020mAh बॅटरी आणि क्वाड रियर कॅमेरा सेट-अप आहे.

- Advertisement -

रेडमी नोट ९ प्रो (Redmi Note 9 Pro)

रेडमी नोट ९ प्रो (Redmi Note 9 Pro) ला ६.६७ इंचाचा पंच होल डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. यात पॉवर बटणासह साइड माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या पुढच्या आणि मागच्या पॅनल्समध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चं संरक्षण देण्यात आलं आहे. फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 64MP देण्यात आला आहे.


हेही वाचा – शाओमीचा Mi 10 Youth Edition 5G स्मार्टफोन लाँच

- Advertisement -

याशिवाय फोनमध्ये 8MPचा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा कॅमेरा दिला गेला आहे. फोन 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 5,020mAh बॅटरीसह येतो. फोन ग्लेशियर व्हाइट, इंटरस्टेलर ग्रे आणि ट्रॉपिकल ग्रीनमध्ये येतो. फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये 6GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB मध्ये येतो. दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे २६९ डॉलर (सुमारे १७,५०० रुपये) आणि २९९ डॉलर (२१,००० रुपये) आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -