घरCORONA UPDATEरस्त्यावर थुंकणं पडलं महागात; स्वःताचा शर्ट काढून केली सफाई

रस्त्यावर थुंकणं पडलं महागात; स्वःताचा शर्ट काढून केली सफाई

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशात विविध स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे लोकं साध्या साध्या नियमांचे पालन करू शकत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर अखेर सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र पब्लिक है की मानती नही. पण आता पोलिसांनीही नियम कडक केले असून शिक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या आहेत. अशीच एक भन्नाट शिक्षा पोलिसांनी दिल्याचे समजते. रस्त्यावर थुंकणाऱ्याचा चक्क शर्ट काढून त्यानेच रस्ता साफ करण्यास पोलिसांनी सांगितल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा – रुग्णवाहिकेअभावी कोरोनाबाधितांचे हाल; तर नागरिक प्रतीक्षेत बेहाल

- Advertisement -

काय आहे घटना 

दक्षिण २४ परगना येथे रस्त्यावर पान खाऊन थुंकणाऱ्याला पोलिसांनी ही शिक्षा दिली. त्या तरुणाचे कपडे उतरवून त्याच्याकडूनच रस्ता साफ करून घेतला. रस्त्यावर थुंकताना ट्रॅफिक पोलिसांनी त्याला पाहिले होते. सध्या कोरोनामुळे देशातच कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ नये याची काळजी आरोग्य खात्याकडून घेतली जात आहे. खरतर थुंकण्यामुळे कितीतरी आजारांचा संसर्ग होऊ शकतो. मात्र काही लोकांना याचे गांभिर्य समजत नाही. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावरील निर्बंध कडक केले आहेत. मात्र असे असतानाही लॉकडाऊनच्या काळातदेखील रस्त्यावर थुंकणाऱ्या घटना पाहायला मिळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -