घरटेक-वेकलवकरच Redmi Note 11 4G भारतात होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स

लवकरच Redmi Note 11 4G भारतात होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स

Subscribe

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) अलीकडेच भारतात रेडमी नोट ११ टी (Redmi Note 11T) लाँच केला आहे. आता लवकरच शाओमी भारतात रेडमी नोट ११ ४जी (Redmi Note 11 4G) लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या महिन्यात चीनमध्ये रेडमी नोट ११ ४जी लाँच केला गेला होता. आता रेडमी नोट ११ ४जीचा हाच व्हेरिएंट भारतात लाँच केला जाणार आहे.

रेडमी नोट ११ ४जीमध्ये MediaTek Helio चिपसेट दिला जाईल. 91mobiles च्या एका वृत्तानुसार, रेडमी नोट ११ ४जी लवकरच लाँच होणार आहे. पण अद्याप लाँच करण्याची तारीख काय आहे? हे स्पष्ट झाले नाही. पण रेडमी नोट ११ ४जी भारतात तीन व्हेरिएंट्मध्ये लाँच केले जाणार आहे. यामध्ये ४जी रॅमसोबत ६४ जीबी स्टोरेज, ४जीबीसोबत २८ जी स्टोरेज, तर टॉप व्हेरिएंटमध्ये ६जीबी रॅमसोबत १२८जीबी स्टोरेजचा पर्याय असेल.

- Advertisement -

रेडमी नोट ११ ४जीच्या चीनी व्हेरिएंटमध्ये ६.५ इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ऐस्पेक्ट रेश्यो २०:९चा आहे. तसेच 90Hz रिफ्रेश रेट दिला गेला आहे आणि 180Hzचा टच सँपलिंग रेट दिला आहे.

रेडमी नोट ११ ४जीमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट दिला गेला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सपोर्ट आहे. प्रायमरी लेंस ५० मेगापिक्सलचा आहे, तर दुसरा ८ मेगापिक्सलाचा अल्ट्रा वाईड लेंस आहे. तर २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी यामध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

- Advertisement -

रेडमी नोट ११ ४जीमध्ये 5000mAhची बॅटरी दिली आहे. शिवाय 18W फास्ट चार्च सपोर्ट दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये युएसबी टाईप सी पोर्ट, जीपीएस आणि ब्लूटूथ सपोर्ट मिळेल.


हेही वाचा – स्वस्त आणि मस्त, भारतात सर्वाधिक विकल्या जातात या इलेक्ट्रीक कार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -