घरटेक-वेकफोनमधील निळ्या लाईटमुळे येऊ शकते अंधत्व !

फोनमधील निळ्या लाईटमुळे येऊ शकते अंधत्व !

Subscribe

रेटिनामधील 'मोलॅक्युल सेल्स'वर या निळ्या प्रकाशाचा थेट परिणाम होऊन त्यामुळे अंधत्व येण्याचा धोका संभावतो, असं अभ्यासामधून समोर आलं आहे. 

आजच्या स्मार्टफोनच्या जगात जवळपास सर्वच वयोगटातील लोक स्मार्टफोन्सच्या आहारी गेले आहेत. एखाद्याला खासगी मेसेज किंवा फोटो पाठवण्यापासून ते कंपनीचा महत्वाचा ई-मेल पाठवण्यापर्यंत सगळीच कामं स्मार्टफोन्सच्या माध्यमातून अगदी सहज होतात. त्यामुळे स्मार्टफोन्सचा वापर आणि त्याची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट त्याचप्रमाणे स्मार्टफोन्सचाही प्रमाणाबाहेर वापर घातक ठरु शकतो. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमधून याविषयची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनुसार, तुमच्या फोनमधून किंवा टॅब, लॅपटॉपसारख्या अन्य डिव्हाईसमधून बाहेर पडणारा निळ्या रंगाचा प्रकाश तुम्हाला आंधळं बनवू शकतो. स्मार्टफोनसारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमधून बाहेर पडणारा ब्लू लाईट हा डोळ्यांच्या रेटिनासाठी अत्यंत घातक असतो. रेटिनामधील ‘मोलॅक्युल सेल्स’वर या निळ्या प्रकाशाचा थेट परिणाम होऊन त्यामुळे अंधत्व येण्याचा धोका संभावतो, असं अभ्यासामधून समोर आलं आहे.

blue light from mobile
प्रातिनिधिक फोटो

अमेरिकेतील टोलॅडो युनिव्हर्सिटीमधील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ‘डिव्हाईसमधून बाहेर पडणाऱ्या प्रखर निळ्या प्रकाशामुळे ‘मॅक्युलर डिजनरेशन’ हा डोळ्यांच्या आजार होऊ शकतो. लवकर बरा न होणाऱ्या या आजाराची लक्षणं साधारण वयाच्या चाळीशीनंतर जाणवू लागतात. या आजारामुळे रेटिनामधील सेल्स कालांतराने संपुष्टात येतात.’ ‘साधारण वयाची पन्नाशी उलटली की दृष्टी हळूहळू कमकुवत व्हायला लागते आणि त्यातूनच अंधत्व येण्याचा धोका उद्भवू शकतो. यामुळे तरुण वर्गातील मुला-मुलींनी भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी स्मार्टफोनच्या अती वापरावर आळा घातला पाहिजे’, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -