घरक्रीडाव्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या जयरामला उप-विजेतेपद

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या जयरामला उप-विजेतेपद

Subscribe

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामला इंडोनेशियाचा शेसर हिरेन रुस्तावितोने पराभूत केले आहे.

व्हिएतनामच्या हो चि मिन्ह या शहरात सुरू असलेल्या व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामला उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याचा इंडोनेशियाचा शेसर हिरेन रुस्तावितोने २१-१४, २१-१० असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

असा झाला सामना

जयराम आणि शेसर हिरेन यांच्यातील सामन्याच्या सुरूवातीपासूनच शेसरने सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र काही वेळातच जयरामने चांगला खेळ दाखवत सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे सेटच्या मध्यंतरापर्यंत शेसरकडे ११-९ अशी अवघ्या २ गुणांची आघाडी होती. पण त्यापुढे जयरामला चांगली लढत देता आली नाही. त्यामुळे त्याने पहिला सेट २१-१४ असा गमावला. तर दुसर्‍या सेटमध्ये शेसरच्या फटाक्यांचे जयरामकडे उत्तर नव्हते. त्यामुळे त्याने हा सेट २१-१० अशा मोठ्या फरकाने गमावला. त्यामुळे त्याला या स्पर्धेच्या उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

सलग दुसरे उपविजेतेपद

अजय जयरामचे हे या मोसमातील सलग दुसरे उप-विजेतेपद ठरले आहे. याआधी ‘व्हाईट नाइट्स आंतरराष्ट्रीय चॅलेंज’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतही अजयला हार पत्करावी लागली होती. मागील वर्षी झालेल्या दुखापतीवर मात करून जयरामने यावर्षी चांगले पुनरागमन केले आहे. जयरामने २०१५ मध्येही कोरिया ओपन स्पर्धेतही उपविजेतेपद पटकावले होते. त्याला अंतिम सामन्यात चायनाच्या चेन लाँगकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -