घरटेक-वेकउद्या पासून या मोबाईल मधे व्हॉट्सॲप होणार बंद

उद्या पासून या मोबाईल मधे व्हॉट्सॲप होणार बंद

Subscribe

फेसबुक कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचे नाव बदलून मेटा असं ठेवल्याची घोषणा केली होती. आता यानंतर वॅट्स ॲपमध्ये देखील मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारतामध्ये सर्वाधीक सोशल मीडिया ॲपच्या वापरापैकी वॅट्स ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. WhatsApp चे नवीन अपडेट उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध होणार आहे. या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप अनेक मोबाईल डिव्हाईसमध्ये काम करणार नाही. यामुळे लाखो लोकांना याचा फटका बसला आहे.(WhatsApp will be closed in this mobile from tomorrow)

वॅट्सअपच्या या नवीन अपडेटमुळे मोबाईल वापरकर्त्यांना एकतर त्यांच्या मोबाईलमधील ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा त्यांना नवीन फोन घ्यावा लागेल. दरम्यान, बहुतेक लोकांकडे जुन्या फोन ऑपरेटिंग सिस्टम हा अपडेटेड असल्यामुले त्यांना या नवीन अपडेटपासून कोणत्याही नुकसानाला सामोरे जावे लागणार नाहीये.

- Advertisement -

व्हॉट्सअॅपच्या या अपडेटमुळे केवळ अँड्रॉइड फोनच नाही तर इतर ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनवरही परिणाम होणार आहे. याचा अर्थ तुमच्याकडे जुना iPhone असल्यास त्यामुळे तुम्हाला त्यातही १ नोव्हेंबरनंतर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.

तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवर OS 4.1 किंवा त्यावरील व्हॉट्सअॅप  सुरू ठेवायचे असल्यास तुमच्या Android फोनचे OS 4.1 किंवा उच्च असावे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही आयफोन वापरकर्ता असाल, तर तुमचा आयफोन iOS 10 किंवा उच्च वर्जनचा असावा.
KaiOS 2.5.0 किंवा नवीन OS वरही, WhatsApp पूर्वीप्रमाणेच काम करत राहील. या सॉफ्टवेअरपेक्षा कमी वर्जनवर चालणाऱ्या फोनमध्ये WhatsApp काम करणार नाही.

- Advertisement -

मोबाईलची यादी-

Samsung: Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core, Galaxy Ace 2.

ZTE: Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987 and Grand Memo.

Sony: Xperia Miro, Xperia Neo L, and Xperia Arc S.

Alcatel, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, and Wiko Darknight, Lenovo A820 UMi X2, Run F1, THL W8.

LG: Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II, Dual Optimus L5, Best L5 II, Optimus L5, Dual Best L3 II, Optimus L7, Optimus L7, Dual Best L7 II, Optimus F6, Enact Optimus F3, Best L4 II, Best L2 II, Optimus Nitro HD, Optimus 4X HD and Optimus F3Q.

Huawei: Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, and Ascend D2.

Apple: iPhone 6, iPhone 6s plus, iPhone SE.


हे हि वाचा – १ नोव्हेंबरपासून होणार आहेत हे ५ मोठे बदल, सामान्यांच्या जीवनावर होणार थेट परिणाम!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -