घरताज्या घडामोडीजेलमधून बाहेर येताच आर्यनने बदलला इन्स्टाग्राम प्रोफाईल; फोटो पाहून चाहते झाले हैराण

जेलमधून बाहेर येताच आर्यनने बदलला इन्स्टाग्राम प्रोफाईल; फोटो पाहून चाहते झाले हैराण

Subscribe

क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये होता. मात्र काल, शनिवारी आर्यन जेलमधून बाहेर आला असून आपल्या घरी मन्नतवर परतला. काल, आर्यनचे मन्नतवर जंगी स्वागत करण्यात आले. आर्यनची जेलमधून सुटका झाल्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. आर्यनच्या जामीनाची बातमी ऐकताच मलायका अरोरा शाहरुखला भेटण्यासाठी त्याचा घरी पोहोचली होती. तसेच शाहरुखच्या सर्व चाहत्यांनी त्याला सपोर्ट केला. आर्थर रोड जेलमधून सुटून घरी पोहोचल्यानंतर आर्यनने सोशल मीडियावरील अकाऊंटमध्ये बदल केले आहेत. जे पाहून चाहते हैराण झाले आहेत.

आर्यन खानने जेलमधून सुटताच सोशल मीडियाला दूर ठेवले आहे. नुकतेच आर्यनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटो बदलला आहे. ज्यामुळे चाहते हैराण झाले असून त्याने असे का केले आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्यनने इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील फोटो हटवून पांढरा रंगाचा फोटो ठेवला आहे. यामुळे आर्यन खूप दुःखी असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबरला त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणात एनसीबीने आर्यनसह २० जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शाहरुखला सपोर्ट केला, तर काहींनी मौन धारण केले. यादरम्यान सलमान खान शाहरुखला भेटण्यासाठी दोन वेळा मन्नतवर गेला होता. तसेच आर्यनच्या जामिनावर सही करण्यासाठी शाहरुखची मैत्रिण अभिनेत्री जुही चावला पुढे आली होती.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -