घरटेक-वेकXiaomi लाँच करणार 200W फास्ट चार्जिंगचा अनोखा स्मार्टफोन!

Xiaomi लाँच करणार 200W फास्ट चार्जिंगचा अनोखा स्मार्टफोन!

Subscribe

स्मार्टफोनच्या चार्जिंग टेक्नॉलजीत दिवसेंदिवस बदल होत आहे. नुकताच विवोने आपल्या नव्या फ्लॅगशीप फोन iQOO 7 ला 120W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह लाँच केले आहे. मात्र आता स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमी असा स्मार्टफोन तयार करत आहे की जो स्मार्टफोन २०० वॅट फास्ट चार्जिंगसह बाजारात लवकरच दाखल होणार आहे. यासह या स्मार्टफोनची अशीही माहिती मिळतेय, या स्मार्टला २०० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट वायर्ड, वायरलेस आणि रिवर्स चार्जिंग होण्यास देखील मदत होणार आहे.

एका फोनवर 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट असणे ही खूप विशेष बाब आहे. परंतु हे आश्चर्यकारक ठरणार नाही कारण कंपनीकडे आधीपासूनच Mi 10 Extreme Commemorative Edition आहे, जी 55W वायरलेस चार्जिंगला ५५ डब्ल्यू वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते ज्यांची एकूण संख्या साधारण 185W आहे, म्हणूनच 200W फास्ट चार्जिंगसह फोन आणणे कंपनीसाठी मोठी गोष्ट नाही. फास्ट चार्जिंगबद्दल सांगायचे झाले तर असा दावा केला जातोय की Xiaomi 67W वायरलेस चार्जिंगसह दोन फोनवरही कंपनी काम करत आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी भारतीय स्मार्टफोन बाजारावर मोठा परिणाम झाला होता, परंतु शाओमीने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. २०२० वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत चिनी स्मार्टफोन निर्माता शाओमीने २६ टक्के वाटा स्मार्टफोन बाजारात पहिल्या क्रमांकावर पोहोचला. शाओमीने दक्षिण कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक्स दिग्गज सॅमसंगचा पराभव केला आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -