घरठाणेयुक्रेनमध्ये अडकले ठाण्यातील ११ विद्यार्थी

युक्रेनमध्ये अडकले ठाण्यातील ११ विद्यार्थी

Subscribe

शहरातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश

रशिया आणि युक्रेन मध्ये युध्द परिस्थिती निर्माण झाल्याने युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले ठाणे जिल्ह्यातून ११ विद्यार्थी अडकल्याची माहिती पुढे आली आहे. प्रामुख्याने हे विद्यार्थी ठाणे शहरासह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मुरबाड, भिवंडी येथील असून त्यामध्ये शहरातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इतर तालुक्यात प्रत्येकी एक- एक विद्यार्थी असल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासह इतर शिक्षणासाठी गेलेल्या सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शुभम म्हाडसे, कल्याण मधील हेमंत नेहरे आणि डोंबिवलीतील संकेत पाटील हे तिघे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. तर, भिवंडीतील संतोष चव्हाण, नवी मुंबईतील प्रथम सावंत आणि ठाण्यातील चैताली आणि लक्ष अशी दोघांची नावे असून तेही शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. युद्धमुळे तेथील परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून हे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. ही माहिती एकत्रित करून ती माहिती राज्य आपत्ती व्यवस्थान विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -