घरठाणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोपिनेश्वर मंदिरात श्रीरामांची महाआरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोपिनेश्वर मंदिरात श्रीरामांची महाआरती

Subscribe

ठाणे । श्री राम प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या प्रसिद्ध कोपीनेश्वर मंदिरातील श्रीरामाच्या मंदिरात उपस्थित राहून आरती केली. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठामपा आयुक्त अभिजित बांगर, शिवसेना प्रदेश प्रवक्ते नरेश मस्के, उपनेते प्रकाश पाटील, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते. यावेळी प्रकाश पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना चांदीची गदा देण्यात आली, यावेळी मंदिराच्या ट्रस्टीना ती गदा देऊन रामाच्या मंदिरात ठेवण्यात आली.
अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकार्‍यांच्या साथीने ठाण्यात कोपिनेश्वर मंदिर परिसरात एकच जल्लोष केला. तसेच श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह पाहून झाल्यावर त्यांनी जय श्रीरामचा एकच जयघोष केला. या प्रसंगी ढोल वाजवून त्यांनी शिवसैनिकांच्या सोबत आपला आनंद साजरा करून सर्व नागरिकांना श्री राम प्राण प्रतिष्ठेच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -