उद्धव ठाकरें उत्तर द्या, किरीट सोमय्यांनी कुटुंबाच्या संपत्ती बद्दल विचारले प्रश्न

Kirit Somaiya criticized Uddhav Thackeray
Kirit Somaiya criticized Uddhav Thackeray

भाजप नेते किरीट सोमय्यांनी ठाकरे कुटुंबार गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली. यावर उद्धव ठाकरे यांनी काय कारवाई केली?, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. ते उल्हासनगरमध्ये बोलत होते.

आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी काय केले? रश्मी उद्धव ठाकरे यांचा १९ बंगल्यांचा घोटाळा बाहेर आला, त्यावर काय केले? उद्धव ठाकरे यांच्या मेव्हुण्याची साडेसहा कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली, काय केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी द्यावीत, असे किरीट सोमय्या म्हणाले.

राम मंदिर अयोध्येचे असो की उल्हासनगरचे सर्वांना रामाचे दर्शन घेण्याचा अधिकार आहे. रामाच्या शरणात जो जातो ते मंजूर आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी एक नेता अयोध्येला जात असताना लगेच आपल्या मुलाला अयोध्येला पाठवून दिले. त्याचवेळी त्याच रामाचा भक्त हनुमानाचा चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणून जेलमध्ये टाकतात, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

पुढे राम हा हिंदुस्थानातील असा देव आहे की प्रत्येकजण रामराज्य आणायचा प्रयत्न करतो. मात्र, उद्धव ठाकरे रामभक्त हनुमान यांचा हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणतात. राजद्रोहासाठी तुरुंगात टाकतात. आमचे स्पष्ट मत आहे की अयोध्येला रामाचे दर्शन करण्यासाठी ज्यांना जायचे असेल त्यांना दर्शन करायला मिळाले पाहिजे, असे किरीट सोमय्या म्हणाले.