घरठाणेLok Sabha : ऐन निवडणुकीत ठाण्यात सापडले ईव्हीएम अन् हजारो मतदान कार्ड,...

Lok Sabha : ऐन निवडणुकीत ठाण्यात सापडले ईव्हीएम अन् हजारो मतदान कार्ड, आव्हाडांकडून संताप

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघासह देशातील 89 लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आरोप केले आहे. (EVMs and thousands of voting cards were found in Thane during the election)

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये जिण्याखालील एक खोलीत ईव्हीएम सापडले आहेत. जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएमची मोजदाद करून निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात सोपवाव्या लागतात. असे असताना ठाण्यात ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? असा प्रश्नांचा भडीमार करत आव्हाड म्हणाले की, ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही मनातली साशंकता आहे. मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : बिहारमध्ये ग्रीन व्होटिंग केंद्र; मतदारांना आकर्षित करण्यासाठी आंब्याच्या रोपांचे वाटप

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बॅलेट पेपरने मतदान झाल्यास आपल्या देशाची लोकसंख्या पाहात मतमोजणीला चार दिवस लागतील, पण मनात संशय राहाणार नाही. परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाशी मी फारसा सहमत नाही. मला माझं मत कुठे गेलं हे कळलचं पाहिजे. माझ्या मनात शंका का राहावी? माझं मत कुणाला गेले हे कळलच नाही तर शंका निर्माण होणारच ना? माझं मत नक्की कुठे गेले? या संशयामुळेच अमेरिकेत ईव्हीएम काढून घेतले गेले, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार नाही (Will not complain to Election Commission)

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तक्रार करून काहीच फायदा होणार नाही. कारण मला बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला होता. तेव्हा एकाही पोलीस अधिकाऱ्याने मला फोन करून यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला. यांना किती गांभीर्य आहे हे यावरून स्पष्ट होते. परंतु दुसरीकडे सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला तर सर्व जण त्याला भेटायला त्याच्या घरी गेले, त्याच्यासोबत फोटो काढले, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Politics : …म्हणून मोदी, फडणवीस, अमित शहा छातीचा फुगा फुगवून चालतात; ठाकरे गटाचा घणाघात

दरम्यान, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील रिकाम्या खोल्यांमध्ये सापडलेले लिफाफे ,मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या. अचानक आठवण आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडली. यानंतर त्यांनी सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश काढले आहेत.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -