घरताज्या घडामोडीLok Sabha 2024: कितीही रडीचे डाव खेळा, आमचीच राष्ट्रवादी जनतेतून दणकून येणार;...

Lok Sabha 2024: कितीही रडीचे डाव खेळा, आमचीच राष्ट्रवादी जनतेतून दणकून येणार; कोल्हेंनी दादांना डिवचले

Subscribe

शिरुर (पुणे) – विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता. लक्षात ठेवा येणार तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच निवडून येणार. तेही जनतेतून दणकून निवडून येणार असा टोला शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरु असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. अमोल कोल्हे यांनी 2016 मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आक्षेप त्यात घेण्यात आला होता.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यावर अमोल कोल्हे यांची उमेदवारी वैध ठरवली. अर्ज वैध ठरल्यानंतर अमोस कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जोरदार समाचार घेतला. अमोल कोल्हे म्हणाले की, विरोधकांच्या छातीत धडकी भरली, म्हणून रडीचे डाव खेळायला लागले. विरोधक बालिशपणाचे राजकारण करत आहेत. पण हे करुन ही उपयोग नाही म्हटल्यावर रडीचा डाव खेळायचं काम त्यांनी सुरु केलं. विरोधकांना एकच सांगतो, सामना दिलेरीने खेळायचा असतो, भ्याडा सारखा खेळायचा नसतो. एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार आणि जनताच घेऊन येणार, हे ठणकावून सांगतो. अजित पवारांचे नाव न घेता अमोल कोल्हे म्हणाले की, कारवाईच्या भीतीने जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024: हिंमत असेल तर ठिकाण तुम्ही निवडा, समोरासमोर चर्चा करु; अमोल कोल्हेंचे अढळरावांना आव्हान

- Advertisement -

2016 ला ओवैसींच्या सभेला केला होता विरोध

अमोल कोल्हे यांनी 2016 ला पुण्यात होणाऱ्या ओवैसींच्या सभेला विरोध केला होता. धार्मिक तेढ वाढू नये, यासाठी हा विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, यासंदर्भात अमोल कोल्हे यांना कोणतेही कल्पना नव्हती, पोलिसांकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नाही. हीच बाब अमोल कोल्हे यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगा समोर स्पष्ट केली.

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -