घरठाणेजातीय सलोखा निर्माण करण्याचे मोर्चाचे यश

जातीय सलोखा निर्माण करण्याचे मोर्चाचे यश

Subscribe

 दोन समाजातील तणावाला लगाम

कल्याण शहरात काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन वंचित समाजाच्या मुलाची धिंद काढल्याने दोन समाजात जातीपातीवरून भांडणे लावण्याचा प्रयत्न सामंजस्यपणाने हाणून पाडला गेला आहे. मंगळवारी सकल भारतीय समाजाने काढलेला भव्य मोर्चाने तणावपूर्ण  वातावरण निवळून टाकण्यास यश मिळवले आहे. राज्यात पाठोपाठ घडत असलेल्या वंचितांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जातीय सलोखा बिघडविण्याचे कटकारस्थान आखले जात असल्याने कल्याण शहरात आगरी – कोळी ,बौद्ध व इतर घटकांनी मिळून कोणा एका जातीच्या विरोधात मोर्चा नसल्याचे दाखवून दिले आहे. कल्याणच्या शहरी तसेच ग्रामीण भागात जात फॅक्टरला महत्त्व दिले जात नाही. मात्र सोशल मीडियावर आई एकविरा देवी बद्दल टीका टिपणी केल्याचा संशय घेतला गेला या संशयाच्या भोवऱ्यात एका सतरा वर्षाच्या बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वंचित घटकातील अल्पवयीन मुलाला टार्गेट करीत त्याची धिंद काढून रस्त्यावर नाक घासायला भाग पाडले होते. त्यामुळे निश्चित जातीय तणाव निर्माण करीत दोन समाजात माथे भडकविण्याचे प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे प्रकरण हाताळून जातीय दंगलीचा होणारा उद्रेक हाणून पाडला.
धार्मिक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी भारतीय सकल समाजाची मोट बांधण्यात आली. आगरी- कोळी, कुणबी- मराठा ,बौद्ध व इतर ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना एका छताखाली आणीत बिघडलेल्या जातीय तणावाला शांत करण्याचा प्रयत्न कॉर्नर सभेने पार पाडला. दंगल घडविण्याचा ज्यांचा मेंदू आहे त्यांचा शोध घेण्याचा सावध पावित्रा या सकल समाजाने घेतला. कोणत्याही एका जातीविरुद्ध सकल भारतीयांचा मोर्चा नसल्याचे घोषणेवरून स्पष्ट झाले. त्यामुळेच आगरी कोळी व इतर समाजाचे नेते प्रामुख्याने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाची तीव्रता व वाढत असणारी गर्दी लक्षात घेता अगदी चौका चौकात पोलीस प्रशासनाने पोलीस तैनात केले होते. मोर्चात गालबोट लागेल असे कृत्य व घोषणा मोर्चाकऱ्यानी न देता संविधान वाचविण्याच्या घोषणा बेंबीच्या देठापासून मात्र देताना दिसून येत होत्या. राज्यात घडत असलेल्या जातीय अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यास गृह खाते कुचकामी ठरत असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजीनाम्याची मुख्य मागणीचे घोषवाक्य तरुण वर्ग करताना दिसून येत होता. आगरी ,कोळी ,कुणबी, मराठा ,बौद्ध या समाजातील घटकांनी मोर्चात सामील होत देशाचा तिरंगा घेऊन आगे कूच करीत होता. कल्याण शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या मोर्चाने एकत्र येत हाणून पाडत संभाव्य होणारी दोन समाजातील कटूता या सखल भारतीय समाजाने मोठे कसब वापरत दंगलीचे वातावरण निर्माण करणाऱ्या घटकांना मात्र चपराक बसविली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -