घरठाणेशिवसेना शिंदे गट आणि भाजपचा टेंडर वाद चव्हाट्यावर

शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा टेंडर वाद चव्हाट्यावर

Subscribe

एकमेकांंवर भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप

उल्हासनगर । उल्हासनगरात शिवसेना शिंदे गट आणि भाजपात सुरु असलेला टेंडर वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे (शिंदे गट) उप जिल्हा प्रमुख अरुण आशान यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थित हा आरोप करण्यात आल्याने भाजपा आणि शिवसेनेत यांच्यात मतभेद असल्याचे उघड झाले आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेत सध्या कोट्यवधी रुपयांचे विकास कामे सुरु आहेत. यातील बहुतांश कामांचा ठेका झा, पी, के अँड कंपनीला देण्यात आले आहे. झापी कंपनीवर खासदार श्रीकांत शिंदे यांचा आशीर्वाद असल्याचे समजते. अरुण अशान हे खासदारांचे अगदी जवळचे समजले जातात. हाच धागा धरून भाजपा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी अरुण अशान आणि झापी कंपनी यांनी बोगस कागद पत्रांच्या आधारे मनपा अधिकार्‍यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने अशान आणि झापी कंपनीच्या आड हा हल्ला अप्रत्यक्ष रित्या खासदारांवर केला असल्याची चर्चा उल्हासनगरात आहे.

रामचंदानी यांनी केलेल्या आरोपाला शिवसेनेचे अरुण आशान यांनी त्वरित प्रत्युत्तर देत ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशी खोचक प्रतिक्रिया देत रामचंदानी यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून फाईल कशी चोरत आहेत, त्याचा व्हिडियो पत्रकाराना दाखविला खरा, परंतु रामचंदानी यांची या आरोपतून निर्दोष मुक्तता झालेली असल्याने त्यांच्या या आरोपात काहीच दम नसल्याचे सांगून भाजपाने अरुण अशान यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे. उल्हासनगर भाजपा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी आरोप केला कि माजी महापौर लिलाबाई आशान यांच्या कारकिर्दीत त्यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे उप जिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी झापी कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळवून दिले आहेत. याची सखोल चौकशी झाली तर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघकीस येईल, आयुक्तांनी या प्रकरणी रितसर चौकशी करावी अन्यथा 15 दिवसांनतर भाजपाच्या वतीने हा मुद्दा उचलण्यात येईल असा इशारा रामचंदानी यांनी दिला.

- Advertisement -

दरम्यान या सर्व आरोपांना फेटाळून लावताना शिवसेनेचे अरुण आशान यांनी पत्रकाराना सांगितले कि रामचंदानी हे स्वतः वादग्रस्त आहेत. त्यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याने रामचंदानी द्वेषपोटी खोटे आरोप करीत आहेत. आयुक्त अजिज शेख यांना या बाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि उल्हासनगर महापालिका विकास कार्यासाठी टेंडर प्रक्रिया आयोजित करुन टेंडरसाठी भाग घेणार्‍या कंपनीची कागदपत्रांची तपासणी करुन टेंडरमध्ये सर्वात कमी दर लावणार्‍या ठेकेदारालाच काम देण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -