घरठाणेआनंद दिघे यांचा एकेरी उल्लेख, उबाठा गटाचे नेते गप्प का - मीनाक्षी...

आनंद दिघे यांचा एकेरी उल्लेख, उबाठा गटाचे नेते गप्प का – मीनाक्षी शिंदे

Subscribe

शिवसेनेचे दोन गट आमनेसामने

 राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आनंद दिघे यांचा एकेरी उल्लेख करीत, लोकांमध्ये दिघे यांच्या संदर्भात संभ्रमाच्या गोष्टी पसरवत आहे,असे असताना देखील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मुग गिळून बसले आहेत का असा सवाल उपस्थित करत शिवसेना महिला आघाडीच्यावतीने निषेध नोंदवला. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांचा तोंडाला चिकट पट्टी लावण्यासाठी शुक्रवारी ठाण्यात आंदोलन केले. याचदरम्यान ठाकरे गटाच्या महिला आघाडीने मिरची पूडद्वारे प्रतिउत्तर देण्याची तयारी केली होती. यावेळी जी बाई शिवसेना महिला आघाडी म्हणजे काय हे विचारायला जावू का असा विचारते. तिला आनंद दिघे किती कळले. असा सवाल करत हे सर्व आमदारकी मिळविण्यासाठी हे नाटक असल्याची टीका ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी केली. दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता लक्षात घेत, पोलिसांनी वेळीच दोन्ही गटांना समोरासमोर येण्यापासून रोखले. मात्र ठाणे शहरात काही वेळ तणावाचे वातवरण पसरले होते.
धर्मवीर आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येत आहे. दिघे यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तुरुंगबाहेर काढले. तसेच दिघे हे संरक्षण वाढविण्यासाठी माझ्या घरी यायचे असे आक्षेपार्ह विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी नोंदविण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या वतीने उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्यास नकार देत, मोर्चा रस्त्यातच अडविला. दरम्यान ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याची आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी मिरची पूड बाळगून पूर्ण तयारी केली होती.यावेळी शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार हे जितेंद्र आव्हाड हे ठाणेकरांमध्ये दिघे यांच्या बाबत संभ्रमाचे वातावरण पसरवत असल्याचा आरोप करीत, महसूल खात्याची फेराफेरी झाल्यानंतर ते स्वत: आनंद आश्रमाचे उंबरठे झिजवत असा गौप्यस्फोट देखील शिंदे यांनी यावेळी केला.
तसेच आनंद दिघे हयात असताना, विरोधकांकडून कधीही फलकबाजी करण्यात आली नव्हती. त्यावेळी सगळ्या नेत्यांची उंदरा सारखी गत होती असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवावर मोठे झालेले नेते सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्या मागे गेले. आज दिघे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर ही ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे असो दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे गप्प आहेत. केवळ राजकारणासाठी दिघे यांच्या फोटोचा वापर करत असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला.
तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील शिंदे गटाच्या महिलांचा विरोध करण्यासाठी व जशाच तसे उत्तर देण्यासाठी आक्रमक झाल्या होत्या. यावेळी जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांनी मीनाक्षी शिंदे यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. जे आज आनंद दिघे यांच्या एकेरी उल्लेख केला, असे बोलत आहेत. मुळात त्यांना दिघे माहित आहे का? जी बाई शिवसेना महिला आघाडी काय हे विचारायला वर जावू का असा प्रश्न करते. तिला आनंद दिघे कितपत कळले. आम्ही आनंद दिघे यांच्या सोबत आयुष्य घालवले, महिला आघाडी उभी केली. आमदारकी मिळविण्यासाठी हे सर्व नाटक सुरु आहेत. हिमंत असेल तर, भिडून दाखवा असा इशारा देखील ठाकरे गटाच्या खोपकर यांनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -