घरठाणेभिवंडीत कोरोनाचे सहा रुग्ण

भिवंडीत कोरोनाचे सहा रुग्ण

Subscribe

भिवंडीत मार्च व २ एप्रिल २३ पर्यंत एकूण ३६ संशयित कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोना बाधित असून त्यांना त्यांच्या घरातच वेगळे ठेवण्यात आले. भिवंडीतील रुग्ण उपचारासाठी शहराबाहेर गेल्यानंतर त्यामध्ये केलेल्या कोरोना चाचणीमध्ये असे संशयित, कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे शहरात देखील उपचारासाठी गेलेल्या रुग्णाची चाचणी केल्यानंतर संशयित रुग्ण आढळून येत आहेत. सध्याचे दमट हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे शहरात सर्दी,खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दवाखान्यात देखील अशा रुग्णाची संख्या वाढलेली दिसून येते.

शहरात देखील मनपाच्या आरोग्य केंद्रात आणि कोरोना सेंटरवर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. चालू वर्षातील मार्च मध्ये ३४ व एप्रिल मध्ये २ असे एकूण ३६ संशयित रुग्ण असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. महानगरपालिकेकडून कोरोना सेंटरवर चाचण्या केल्या जात असून रुग्णात वाढ झाल्यास धोबीतलाव येथील खुदाबक्ष हॉल मध्ये उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या हॉलमध्ये एकूण १३७ बेड असून त्यापैकी ५० आयसीयू बेड आहेत. अशी माहिती भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -