घरठाणेकल्याणमध्ये कास्ट्राईब फेडरेशनचे रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन

कल्याणमध्ये कास्ट्राईब फेडरेशनचे रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन

Subscribe

कल्याण । अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि बौद्ध कर्मचारी कल्याण महासंघ या सर्वांच्या न्याय हक्कांसाठी लढणार्‍या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ कास्ट्राईब फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी कल्याणमध्ये आयोजित करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेतील के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत चालणार्‍या या अधिवेशनात महाराष्ट्र शासनाचे अनेक प्रधान सचिव, अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्यासह राज्यभरातून तब्बल 5 हजारच्या आसपास कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती राज्यअध्यक्ष अरुण गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल धांडे, राज्यसहसचिव सुशील तायडे, कोकण विभाग कार्याध्यक्ष रविराज गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय धनगर, मलेरिया फायलेरिया अध्यक्ष विजय चव्हाण, नागपूर जिल्हा सचिव अशोक पाटील, अ‍ॅड. गुलाब खंदारे, अ‍ॅड. मुकुंद सवाई आदी पदाधिकारी उपस्थित होते. कास्ट्राईब फेडरेशनसोबत संलग्न असलेल्या कास्ट्राईब राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, कास्ट्राईब सुशिक्षित बेरोजगार संघटना, कास्ट्राईब अंगणवाडी कर्मचारी संघटना, कास्ट्राईब एनसीडी कर्मचारी संघटना, कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटना, कास्ट्राईब आरोग्य कंत्राटी संघटना, कास्ट्राईब नर्सेस संघटना, कास्ट्राईब जिल्हापरिषद कर्मचारी संघटना, कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ, कास्ट्राईब मंत्रालयीन संघटना आदींचे पदाधिकारी आणि सदस्य या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -