घरक्राइमCrime : आईवर कोयत्याने 70 ते 75 वार अन् गुन्हा लवण्यासाठी संतापजनक...

Crime : आईवर कोयत्याने 70 ते 75 वार अन् गुन्हा लवण्यासाठी संतापजनक प्रकार

Subscribe

लातूर : संपत्तीवरून वाद होणाऱ्या बातम्या आपण अनेकदा वाचतो आणि आपल्या कानावर येत असतात. काही वेळा हा वाद मारामारीपर्यंत जातो, तर काही वेळेला एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत जातो. परंतु संपत्तीसाठी पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याचे कधी ऐकायला मिळाले नसेल. परंतु हा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. संपत्तीसाठी मुलाने आईच्या अंगावर कोयत्यानं तब्बल 70 ते 75 वार केले आणि त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी संतापजनक प्रकार केला. परंतु पोलीस तपासात हे प्रकरण उघड झाले असून मुलाला अटक करण्यात आली आहे. (70 to 75 blows on the mother with a crowbar and angry type of crime)

हेही वाचा – LokSabha : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी पुन्हा वायनाडमधून मात्र ‘हा’ उमेदवार गायब

- Advertisement -

हॉटेल व्यावसाय करणाऱ्या 55 वर्षीय महिलेची लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलीस ठण्याच्या हद्दीत निर्दयी आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. सखुबाई वाघमारे असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी मुलगा नागनाथ वाघमारे याने संपत्तीच्या वादातून सखुबाई वाघमारे यांची 24 फेब्रुवारी रोजी हत्या केली आहे. त्याने आईच्या अंगावर 70 ते 75 वार करत तिची हत्या केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा लपवण्यासाठी संतापजनक प्रकार केला.

हेही वाचा – MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंचे ‘ते’ आरोप राहुल नार्वेकरांनी खोडून काढले

- Advertisement -

सखुबाई वाघमारे या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली, परंतु आरोपी काही केल्या मिळत नव्हता. अखेर पोलिसांनी नागनाथ वाघमारे याची कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, संपत्तीच्या वादातून आईच्या अंगावर कोयत्याने 70 ते 75 वार करून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या अंगावरचे कपडे काढून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून पोलिसांना असेच वाटेल की, आईचा बलात्कार करून खून केला आहे आणि पोलीस माझ्यावर संशय घेणार नाहीत. त्यामुळे हा बनाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी सखुबाई वाघमारे यांच्या हत्येप्रकरणी नागनाथ वाघमारे याच्याविरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रकरण पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -