घरठाणेआयुक्तांनी आता शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी

आयुक्तांनी आता शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी

Subscribe

पेपरफुटीचा अर्थसंकल्प असल्याची आनंद परांजपे यांची टीका

स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच शिवसेनेशी संलग्न असलेल्या वृत्तपत्रामध्येच तो छापण्यात आला आहे. या संदर्भात आपला थेट आरोप आहे की अर्थसंकल्प फुटला, यास जबाबदार आयुक्त डॉ. बिपीन शर्मा हेच आहेत. त्यांची भूमिका शिवसेनाभिमुख असल्याने त्यांनी प्रशासकीय सेवेचा त्यांनी राजीनामा द्यावा आणि येणार्‍या ठामपाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष खासदार आनंद परांजपे यांनी आयुक्तांवर शरसंधान केले.

ठाणे महानगर पालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच तो एका वृत्तपत्रामध्ये छापण्यात आला होता. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्येच  गदारोळ केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

- Advertisement -

आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,  ठाणे महानगर पालिकेचा आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा नरेंद्र बल्लाळ सभागृहात सादर करणार होते. स्थायी समितीच्या 16 सदस्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्थसंकल्पाची प्रत मिळाली नव्हती. अशा प्रकारची माहिती आपणाला मिळाली आहे. मात्र, शिवसेनेशी संलग्न असलेल्या एका वृत्तपत्रामध्ये  सकाळीच संपूर्ण अर्थसंकल्प छापून आला. म्हणून मी स्वत: राज्याचे मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांच्याकडे तक्रार करणार आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याकडेही तक्रार करणार आहोत.

कायमच डॉ. शर्मा हे शिवसेनेचे शाखाप्रमुख असल्यासारखे वागत आहेत. माझा तर त्यांना सल्ला आहे की, प्रशासकीय सेवेचा त्यांनी राजीनामा द्यावा आणि येणार्‍या ठामपाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी; आपण या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यातही गोपनियता कायद्याचा भंग केल्याप्रकरणी आयुक्तांविरोधात लेखी तक्रार नोंदविणार आहे. हा अर्थसंकल्प फुटला असल्याने तो नव्याने सादर करावा, अशी मागणीही परांजपे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -