घरठाणेकल्याणमधील स्मशानभूमीतील कामगारांचे जीव धोक्यात

कल्याणमधील स्मशानभूमीतील कामगारांचे जीव धोक्यात

Subscribe

सुरक्षा साधनांशिवाय उचलावे लागतात पिपिई कीट

राज्यतसह कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडा देखील वाढत आहे. या मृतांवर विविध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हे करतांना मृतदेह हाताळणाऱ्यांकडून वापरण्यात आलेले पिपिई कीट कोणतीही विल्हेवाट न लावता त्याठिकाणी उघड्यावर टाकण्यात येत आहेत. हे पिपिई कीट सफाई कामगारांना उचलावे लागत आहेत. यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सफाई कर्मचारी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. शहरातील रस्त्यांची नियमित साफसफाई करणे, कचरा कुंड्यांमधील कचरा उचलणे, इतरत्र असलेला कचरा गोळा करणे आदी महत्त्वाची कामे करून शहर स्वच्छतेकडे भर देत आहेत.

सफाई कामगार ही महत्वाची भूमिका पार पाडत असताना स्मशानभूमीतील कचरा गोळा करताना त्यांना त्याठिकाणी टाकलेले पिपिई कीट देखील कोणत्याही सुरक्षाविषयक साधनांशिवाय उचलावे लागत आहेत. पिपिई कीट हे बायोमेडिकल वेस्ट प्रकारात येत असल्याने त्यांची विल्हेवाट ही विशेष खबरदारी घेऊन विशिष्ट पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे. शिवाय हे बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. हे काम मेडिकल डिपार्टमेंटच आहे. असे असताना हे पिपिई कीट इतर कचऱ्या सोबत डम्पिंग ग्राउंडला टाकण्यात येत आहे. याबाबतचे कोणतेही प्रशिक्षण या सफाई कर्मचाऱ्यांना दिले जात नाही. यामुळे सफाई कामगार आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

- Advertisement -

याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता सफाई कर्मचाऱ्यांना योग ती सुरक्षाविषयक साधने पुरविण्याबाबत सूचना करणार असल्याचे सांगितले. कोविड योद्धे असलेले सफाई कामगार लसीकरणापासून वंचित आहेत. लसीकरण कुठे करायचे हे बऱ्याचशा सफाई कामगारांना माहिती नाही. रुक्मिणीबाई हॉस्पिटल मध्ये गेलो तर तेथे वरिष्ठ नागरिकांना लसीकरण आहे असे सांगितलं जाते. आमचे आरोग्य निरीक्षक तर कोणतीच माहिती आम्हाला देत नाहीत फक्त्त कामच सांगत आहेत. तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल अस सांगितलं जातं असल्याचे या सफाई कामगारांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -