घरठाणेदिव्यात तीन अल्पवयीन मुले दुचाकीवर स्वार, डंपरखाली येऊन एकाचा मृत्यू

दिव्यात तीन अल्पवयीन मुले दुचाकीवर स्वार, डंपरखाली येऊन एकाचा मृत्यू

Subscribe

ठाणे – बाईकवरील नियंत्रण सुटल्याने डंपरखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दिवा येथे घडली आहे. दिवा शिळफाटा रोडवर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला असून दोघेजण जखमी झाले आहेत.

गोपेंद्र शुक्ला (१५), रोहन सिंगे (१६), अशोक चौधरी (१४) हे तिघेही अल्पवयीन मुलं दिवा बाजारपेठेत शाळेतील प्रकल्पासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गेले होते. तिथून ते पुन्हा आपल्या घराकडे परतत असताना दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला. ताबा सुटल्याने बाईकवरील तिघेही डंपरच्या मागच्या चाकाजवळ कोसळले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या गोपेंद्रच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – पंढरपूर, जेजुरी दर्शन घेऊन आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांची गाडी उलटली; तिघे गंभीर जखमी

या अपघाताची बातमी दिवा शहरात पसरल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन डंपर आणि बाईक जप्त केली आहे. या अपघातात रोहन सिंगे आणि अशोक चौधरी हे जखमी झाले असून अपघातातील मृत अल्पवयीन गोपेंद्र शुक्ला याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शहाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र किंगरे करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – बंदोबस्तावरील पोलीस हवालदाराची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -