घरक्राइमबंदोबस्तावरील पोलीस हवालदाराची स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या

बंदोबस्तावरील पोलीस हवालदाराची स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या

Subscribe

अहमदनगर : राहुरी मुळा धरणाच्या मुख्य गेटवर ऑनड्युटी कार्यरत असलेले पोलीस हेडकोन्स्टेबल भाऊसाहेब दगडु आघाव (वय ५२ वर्षे,राहनार बारागांव नांदुर) यांनी आज सकाळी आपल्या कडे असलेल्या सरकारी रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल राहुरी पोलीस तपास करत आहेत. हेडकोन्स्टेबल आघाव पोलीस खात्यात सेवेत होते. त्यांची नेमणूक जिल्हा मुख्याल अहमदनगर येथे असून सध्या ते मुळा धरणाच्या सुरक्षेसाठी धरणाच्या मुख्य चौकीवर बंदोबस्तास असताना शनिवारी (दी.१) सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या दरम्यान स्वःताचे सर्विस रायफल मधुन गोळी मारून घेऊन अत्महत्या केली.

घटनेमुळे जिल्हा पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस फौजफाट्या सह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भाऊसाहेव आघाव यांनी चौकीच्या दाराला आतुन कडी लावून आत्महत्या केल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. राहुरी पोलीसांनी पंचा समक्ष चौकीचे दार लाथा मारून तोडून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उतरीय तपासणी साठी राहुरी येथे पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तातडीने भेट देत माहिती घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नव्हते. राहुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. ,मात्र अश्या घटनेमुळे पोलीस प्रशासनात तसेच एकूणच जिल्हयाभरात एकच खळबळ उडाली आहे. आघव यांनी आत्महत्या का केली हे जरी स्पष्ट झाले नसले तरी पोलीस प्रशासनातील कर्मचार्‍यांच्या कामाची वेळ तसेच आपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे येणारा कामाचा ताण यामुळे एकूणच शारीरिक तसेच मानसिक स्वस्थावर होणारा परिणाम ही नक्कीच चिंतेची बाब झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -