घरठाणेमोठ्या बहिणीकडे निघालेले दोन अल्पवयीन भाऊ बहीण बेपत्ता

मोठ्या बहिणीकडे निघालेले दोन अल्पवयीन भाऊ बहीण बेपत्ता

Subscribe

राष्ट्रीय चर्मकार संघाची कारवाईची मागणी

उल्हासनगर । हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात राहणारे अल्पवयीन भाऊ बहीण ही मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी घरून निघाली मात्र बहिणीच्या घरी पोहचली नाहीत. या मुलांच्या वडीलांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप जगताप यांनी दिली.
उल्हासनगर शेजारील द्वारली गावातील साईचाळ येथे अविनाश दास कुटुंबासह राहतात. रविवारी सायंकाळी 7 वाजता धनश्री (15) आणि साईआशीष (10) हे अल्पवयीन भाऊ-बहीण परिसरातील मोठी विवाहित बहीण साईश्रद्धा हिच्या घरी मुख्य रस्त्यावरून रविवारी सायंकाळी 7 वाजता जाण्यास निघाले. मात्र मोठ्या बहिणीकडे पोहचले नाही. हे वडील अविनाश यांना समजल्यावर त्यांनी दोन्ही भावाचा नातेवाईक, शेजारांच्या मदतीने शोधाशोध सुरू केला. अखेर सोमवारी हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून अधिक शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -