घरठाणेकामगार पतीची हत्या, महिलेसह दोघे अटकेत

कामगार पतीची हत्या, महिलेसह दोघे अटकेत

Subscribe

आरोपींना पोलीस कोठडी

भिवंडी तालुक्यातील कांबे परिसरात काही दिवसांपूर्वी रस्त्यालगतच्या पुलाखाली मृतदेह गोणीत बांधून फेकलेल्या स्थितीत आढळला होता. या हत्येचा शोध लावून तीन आरोपींना अटक करण्यात निजामपुरा पोलिसांनी यश मिळविले. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी दिली आहे. वीस जानेवारी रोजी कांबे पॉवर हाऊस जुनादुर्खी रस्त्यावरील रुपाला ब्रिजच्याखाली रक्ताने माखलेल्या एका गोणीमध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फाटलेल्या औषध प्रिस्क्रीप्शनवरून शोध
सुरुवातीला या मृत इसमाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पोलीस पथके बनवीत तपास सुरू केला होता. तपासात मृतदेहाच्या शर्टाच्या खिशात अर्धवट फाटलेले डॉक्टर प्रिस्केपशनचे कागद सापडल्यानंतर या आधारावरून तपासाची दिशा ठरवीत मेडिकल दुकानदार यांच्या कडून प्रिस्केपशन कोणत्या भागातील डॉक्टरची आहे. याचा शोध घेत असतांनाच पोलिसांना एक महिला आपल्या पतीचा शोध घेत असल्याचे समजले.

- Advertisement -

या महिलेला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह अरमान शेर अली शाह ( ४५ ) याचा असल्याचे स्पष्ट झाले. ही हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीचे ती काम करीत असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या मोहम्मद सलमान अब्दुल मुकीद शेख या सोबत अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्या वरून मृत व्यक्तीने ते काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन मालकास याबाबत सांगितले. त्यानंतर सलमानला जाब विचारला असता त्याचा राग मनात ठेवून त्याने आपले सहकारी तस्लिमा हलीम अन्सारी, चांदबाबु उर्फ बिलाल सईद अन्सारी यांच्या मदतीने मृत अरमान शेर अली शाह यास फसवून नेत त्यावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेत कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी या हत्येच्या गुन्ह्यातील मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या आरोपींना अवघ्या ४८ तासात अटक करीत गुन्ह्याचा उलगडा निजामपुरा पोलिसांनी केला. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -