घरमहाराष्ट्र'इतिहासाला अर्थ जाच्या त्याच्या समजुती एवढा', आशिष शेलारांचा राऊतांना टोला

‘इतिहासाला अर्थ जाच्या त्याच्या समजुती एवढा’, आशिष शेलारांचा राऊतांना टोला

Subscribe

इतिहासाला अर्थ केवढा तर जाच्या त्याच्या समजूती एवढा,अशा मोजक्या शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  सोमवारी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपचा जन्म व्हायच्या आधी शिवसेनेचे वाघ अनेकदा मुंबईत निवडून आले आहेत, असे म्हटले होते. या टीकेला आशिष शेलार यांनी आज प्रत्युत्तर दिले.

शिवसेना जन्म सन १९६६ साली झाला. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खासदार संजय राऊत यांचा जन्म सन १९६१ साली झाला. त्यामुळे जन्मापूर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो, आमचे दोन नगरसेवक कानिटकर आणि कोरडे हे १९५७ साली मुंबईत निवडून आले होते, असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

- Advertisement -

राऊतांच्या जन्मवर्षी म्हणजे १९६१ ला आमचे हशु अडवाणी नगरसेवक म्हणून निवडून आले. तर सन १९६७ ला हशु अडवाणी चेंबूर मधून विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. तुमचे पहिले आमदार वामनराव महाडिक १९७० साली परळ मधून जे निवडून आले तेही आमच्या पाठींब्यावर.. त्यामुळे उगाच सोईने इतिहास उगळू नका, असे शेलार यांनी सुनावले आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हिंदुत्ववाच्या विचारांसाठी युतीत”आम्ही गर्व से कहो” म्हणत होतो. मात्र, आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या जाज्वल्य इतिहासाच्या फुलांचे निर्माल्य झाले वाटतेय, अशी खंतही आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.


Mumbai Corona Update: मुंबईत आज 1815 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 11 रुग्णांचा मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -