घरट्रेंडिंगअंत्यसंस्कारानंतर मृत महिला पुन्हा झाली जीवंत

अंत्यसंस्कारानंतर मृत महिला पुन्हा झाली जीवंत

Subscribe

पंजाबच्या पटियाला येथे अंत्यसंस्कार केलेली मृत महिला पुन्हा जीवंत झाल्याची अजब घटना समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी ज्या मुलीवर अंत्यसंस्कार केले तीच मुलगी दारात जीवंत उभी असल्याचे पाहून कुटुंबाला धक्का बसला.

पंजाबच्या पटियाला येथे अंत्यसंस्कार केलेली मृत महिला पुन्हा जीवंत झाल्याची अजब घटना समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी ज्या मुलीवर अंत्यसंस्कार केले तीच मुलगी दारात जीवंत उभी असल्याचे पाहून कुटुंबाला धक्का बसला. पंजावच्या पटियाला शहरामध्ये ही घटना घडली. २६ वर्षीय नैना जीवंत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबाला आनंद झाला पण त्यामुळे पोलिसांची अडचण वाढली आहे. नैनाच्या कुटुंबियांनी मग अंत्यसंस्कार केले ती महिला कोण होती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पटियाला पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुन्हा तपास सुरु केला आहे.

काय आहे घटना

पंजाब पोलिसांना ११ डिसेंबरला पटियाला येथील बायपास रोडवर छिन्न-विछिन्न अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह सापडला होता. नैना मूळची पटियालाची असून चामकौर साहिब येथे राहणाऱ्या व्यक्तीबरोबर तिचे लग्न झाले होते. आठ डिसेंबरपासून नैना तिच्या घरातून बेपत्ता होती. ११ डिसेंबरला पोलिसांना २० ते २५ वयोगटातील एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. १४ डिसेंबरला नैनाच्या कुटुंबियांनी तो मृतदेह तिचाच असल्याचा दावा करुन १५ डिसेंबरला अंत्यसंस्कार केले.

- Advertisement -

नैनाच्या हत्येचा संशय

नैना घरातून पळून गेल्याचा तर्क पोलिसांनी लावला होता. ती ज्याच्यासोबत पळून गेली त्याच माणसाने तिची हत्या केली असावी, असा पोलिसांचा तर्क होता. आता नैना घरी परतल्यामुळे पोलिसांनी पुन्हा नव्याने तपास सुरु केला आहे. पोलिसांकडे महिलेच्या डीएनएचे नमुने आणि बोटांचे ठसे असतील तर त्यावरुन ते मृतदेहाची ओळख पटवू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -