घरमुंबईवायफाय सुविधेचा उपयोग ज्ञानवर्धनासाठी करा – अर्थमंत्री

वायफाय सुविधेचा उपयोग ज्ञानवर्धनासाठी करा – अर्थमंत्री

Subscribe

कोणताही देश किती धनसंपन्‍न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्‍न आहे यावर त्‍या देशाच्‍या प्रगतीचे मुल्‍यमापन केले जाते. त्‍यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्‍या सेवेत रूजु होणाऱ्या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्‍या बेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्‍यासाठी करण्‍याचे आवाहन चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कोणताही देश किती धनसंपन्‍न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्‍न आहे यावर त्‍या देशाच्‍या प्रगतीचे मुल्‍यमापन केले जाते. त्‍यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्‍या सेवेत रूजु होणाऱ्या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्‍या बेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्‍यासाठी करण्‍याचे आवाहन चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा शहर आणि तालुक्‍याच्‍या विकासाची प्रक्रिया यापेक्षाही अधिक गतीमान करण्‍यासाठी मला आपल्‍या सर्वांच्‍या सहकार्याची आवश्‍यकता असल्‍याचे ते म्‍हणाले. पोंभुर्णा शहरात नविन बस स्‍थानक बांधकामाचा भूमीपूजन सोहळा तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पण या कार्यक्रमांच्‍या निमीत्‍ताने आयोजित जाहीर सभेत मुनगंटीवार बोलत होते.

वाचा : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत कष्टकऱ्यांचा सन्मान

- Advertisement -

मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पोंभुर्णा शहर आणि तालुक्‍यातील नागरिकांच्‍या सोईच्‍या दृष्‍टीने सर्व सोयींनी युक्‍त असे बस स्‍थानक निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी माझ्याकडे केली. ज्‍या तालुक्‍यातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे त्‍या नागरिकांची मागणी मी प्राधान्‍याने पूर्ण केली तर आज बस स्‍थानकाच्‍या बांधकामाचे भूमीपूजन करताना अतिशय आनंद होत आहे. एसटी महामंडळाला ७०० नवीन बसेस खरेदीसाठी जेव्‍हा मी मान्‍यता दिली त्‍यावेळी त्‍यांना २०० बसेस चंद्रपूर जिल्‍हयासाठी देण्‍याबाबत सुचना मी दिल्‍या. पोंभुर्णा शहर आणि तालुक्‍यात विविध विकासकामे आम्‍ही पूर्णत्‍वास नेली आहेत. शहरात डॉ. श्‍यामप्रसाद मुखर्जी वाचनालय लवकरच जनतेच्‍या सेवेत रूजु होत आहे. स्‍मशानभूमी, कब्रस्‍तान, आठवडी बाजार यांची कामे प्रगतीपथावर आहेत.

वाचा : राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही – सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुध्‍दा लवकरच सुरू होणार असून इतरही विकासकामे प्राधान्‍याने पूर्णत्‍वास येत आहेत. बिव्‍हीजी च्‍या मदतीने ५ हजार एकरवर शेती नवनविन प्रयोग करण्‍याचे प्रस्‍तावित असून यासाठी विख्‍यात उद्योजक रतन टाटा यांचा मी आभारी आहे. पोंभुर्णा तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी कुक्‍कटपालन योजनेच्‍या माध्‍ममातुन रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या असून घोंगडी क्‍लस्‍टरला मान्‍यता दिली आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्‍य, कृषी विकास, रस्‍ते विकास, पाणी पुरवठा, विद्युत व्‍यवस्‍था या सर्वच घटकांवर विशेष लक्ष्‍य केंद्रीय करून पोंभुर्णा शहर तसेच तालुक्‍याचा विकास करण्‍यासाठी आपण कटिबध्‍द असल्‍याचे ते यावेळी बोलताना महणाले.

वाचा : कॅबिनेटमध्ये रामदास कदम वि. सुधीर मुनगंटीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -