घरट्रेंडिंगVivah Muhurat 2022 : नववर्षात 'या' मुहूर्तावर होणार 'शुभमंगल सावधान'

Vivah Muhurat 2022 : नववर्षात ‘या’ मुहूर्तावर होणार ‘शुभमंगल सावधान’

Subscribe

गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले होते.त्यामुळे या दोन वर्षांत अनेकांची ठरलेली लग्नकार्य रखडली होती. याशिवाय ज्यांची लग्ने झाली त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने आपली लग्नकार्ये पार पाडली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत यंदाचे २०२१ हे वर्ष सरुन २०२२ या वर्षाला सुरुवात होणार आहेत.या रखडलेल्या लग्नकार्यांसाठी २०२२ या नववर्षात ९ महिने विवाहाचा मुहूर्त असून,यंदा कर्तव्य आहे. नवीन वर्ष २०२२ मध्ये ऑगस्ट,सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तीन महिने वगळता इतर नऊ महिन्यांत विवाह मुहूर्त आहेत. अशी माहिती जेष्ठ पंचागकर्ते,खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यांनी दिली आहे. यंदा शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी ‘लीप सेकंद’धरला जाणार नसल्यामुळे नूतन वर्ष २०२२ चा प्रारंभ शुक्रवारी रात्री ठीक १२ वाजता होणार असल्याची माहिती सोमण यांनी दिली आहे.

हे सुट्टीचे दिवस येणार रविवारी

सन २०२२ मध्ये एकूण मिळणाऱ्या २४ सुट्ट्यांपैकी श्रीरामनवमी १० एप्रिल,महाराष्ट्र दिन १ मे,बकरी ईद १० जुलै,महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर,ईद ए मिलाद ९ ऑक्टोबर आणि २५ डिसेंबर अशा एकूण सहा सुट्ट्या रविवारी येत आहेत.याशिवाय २०२२ हे वर्ष लीप वर्ष नसल्याने वर्षात एकूण ३६५ दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

हे ग्रहण भारतातून दिसणार 

२०२२ मध्ये २ सुर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे असणार आहेत. यापैकी २५ ऑक्टोबरला खंडग्रास सुर्यग्रहण आणि मंगळवार ८ नोव्हेंबरचे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार मात्र, शनिवारी ३० एप्रिलचे खंडग्रास सुर्यग्रहण आणि सोमवार, १६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार नाही,अशी माहिती सोमण यांनी दिली आहे.

खगोलप्रेमींना आकाशात उल्का पाहण्याची संधी

खगोलप्रेमींसाठी २०२२ या नूतनवर्षी ४ जानेवारी,२२ एप्रिल,५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ऑगस्ट, २२ ऑक्टोबर,१७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबरच्या रात्री आकाशात उल्का वर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. सन २०२२ मध्ये मंगळवार १४ जून रोजी जेष्ठ पौर्णिमेच्या आणि बुधवार १३ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येणार आहे. याशिवाय यावर्षात सुपरमुन पाहायला मिळणार आहे. सन २०२२ मध्ये कोणत्याही इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येत नसल्याने यावर्षी ब्लू मून योग पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

यादिवशी असणार संकष्टी

सन २०२२ मध्ये सोने खरेदी करण्यासाठी ३० जून,२८ जुलै आणि २५ ऑगस्ट असे तीन गुरुपुष्यामृत योग येणार आहेत.गणेश भक्तांसाठी २०२२ मध्ये १९ एप्रिल आणि १३ सप्टेंबर अशा दोन अंगारकी संकष्ट चतुर्थी येणार आहेत.


हेही वाचा – सहदेव ते रानू मंडलपर्यंत रातोरात प्रसिद्ध झाले ‘हे’ स्टार, पण आता करतात तरी काय?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -