Ind vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय संघाची नव्या इतिहासाची नोंद

ind win

सेंच्युरीयन येथील सुपर स्पोर्ट पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ११३ धावांनी पराभूत केले. सेंच्युरियन येथे विजय मिळवणारा भारत हा आशियातील पहिला देश ठरला आहे. सेंचुरीयन येथे भारताचा पहिला विजय आहे. याआधी कोणत्याही आशियाई संघाने या मैदानात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले नव्हते. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने या मैदानात खेळलेल्या सामन्यात हा तिसरा पराभव आहे.

भारतीय संघाने चौथ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना यजमान संघ १९१ धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवले. तर रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या विजयासह भारताने या सामन्यात १-० ने आघाडी घेतली आहे. ३०५ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे पाचव्या दिवशी १९१ धावांवर सर्व गडी बाद झाले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कॅप्टन डीन एल्गरने सर्वाधिक अशा ७७ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली.

शमी आणि बुमराहने दुसऱ्या सामन्यात सर्वाधिक अशा तीन तीन विकेट्स आपल्या नावे केल्या. पाचव्या दिवसाची सुरूवात ९४ धावांवर ४ गडी बाद अशी केल्यानंतर लंचपर्यंत १८७ धावांवर टीमने सात गडी गमावले. त्यामध्ये डीन एल्गर, डिकॉक, मुलडर यासारख्या खेळाडूंचा समावेश होता. या सामन्यात बुमराह, सिराज आणि शमीने एक एक विकेट घेतली.

दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेचा संघ १९१ धावांवर ऑल आऊट झाला. लंचनंतरच्या सत्राच्या सुरूवातीलाच शमीने जॉन्सनला १३ धावांवर बाद केले. तर अश्विनने पुढच्याच ओव्हरमध्ये कगीसो रबाडा आणि लुंग एनगिडीला बाद करत सेंचुरियन टेस्टमध्ये विजय मिळवला.