घरट्रेंडिंगमहिलेला कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

महिलेला कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

Subscribe

कॉन्टॅक्ट लेन्सेस चष्म्याच्या तुलनेत अधिक सुविधाजनक असतात. एक्सपर्ट्स मते, चष्म्याच्या तुलनेत कॉन्टॅक्ट लेन्सेसवर वातावरणाचा कमी परिणाम होतो. त्यांच्यावर चष्म्याप्रमाणे वाफ जमा होत नाही आणि त्यामुळे जास्त नीट पाहू शकता. बाजारामध्ये अनेक प्रकारचे कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात. काही लोक आवड म्हणून विविध रंगाचे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरतात. तर काहीजण डोळ्यांसाठी. यासंदर्भात नुकतीच घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका महिलेने तिच्या डोळ्यांमधून 23 कॉन्टॅक्ट लेन्सेस काढले. या लेन्सबाबत सांगितलं जात की, ती आपल्या डोळ्यातील कॉन्टॅक्ट लेन्सेस काढायला विसरली होती.

खरंतर, एका महिलेच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला. जेव्हा हा त्रास हळूहळू वाढत गेला तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि तिने तिची समस्या डॉक्टरांना सांगितली. सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं की, तिच्या डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेसता एखादा तुकडा अडकला असावा. पंरतु जेव्हा डॉक्टरांनी तिचे डोळे तपासले तेव्हा त्यातून काहीच निघालं नाही. डॉक्टरांनी आपल्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांना बोलावून लगेच व्हिडीओ काढला. कारण डॉक्टरांनी जर ती गोष्ट इतरांना सांगितली असती, तर कोणाचाही त्यावर विश्वास बसला नसता.

- Advertisement -

सध्या त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यातील महिलेने सांगितलं की, मागील 30 वर्षापासून ती कॉन्टॅक्ट लेन्सेस वापर करत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून ती कॉन्टॅक्ट लेन्सेस रात्री झोपताना काढायला विसरली होती.

आयुष्यात पहिली विचित्र केस
ही केस पहिल्यांदा हाताळलेल्या डॉक्टरांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की, “या रुग्णाच्या डोळ्यांमधून मी 23 कॉन्टॅक्ट लेन्सेस काढले आहेत. हि माझ्यासाठी नवी आणि वेगळी केस होती. यामुळे रुग्णाच्या डोळ्याची रोशनी देखील जाऊ शकते. जेव्हा कोणी रात्री कॉन्टॅक्ट लेन्सेस काढायला विसरतं तर त्याला सकाळी कळत नाही की त्याने कॉन्टॅक्ट लेन्सेस आधीपासून घातले आहेत. एक महिला लागोपाठ 23 दिवस कॉन्टॅक्ट लेन्सेस काढायला विसरली आणि रोज सकाळी ती नवीन लेंस लावत होती.मात्र त्या महिलेचे नशीब चांगले की तिच्या डोळ्यातून कॉन्टॅक्ट लेन्सेस काढून देखील तिच्या डोळ्यांना काही हानी झाली नाही.”

- Advertisement -

हेही वाचा :

मुंबईच्या हॉटेलचालकाचा ACसाठी देसी जुगाड, व्हिडीओ व्हायरल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -