घरट्रेंडिंगअभिनेत्रीला नाकाची सर्जरी पडली महागात, आता विचारतेय कुठंय गं बाई माझं नाक

अभिनेत्रीला नाकाची सर्जरी पडली महागात, आता विचारतेय कुठंय गं बाई माझं नाक

Subscribe

सुंदर दिसण्याच्या नादात लोक काय करतील याचा नेम नाही. अनेकदा सेलिब्रिटी यासाठी कॉस्मेटिक सर्जरी हा पर्याय निवडतात. परंतु या कॉस्मेटिक सर्जरी अनेकदा जीवघेण्या ठरल्याची उदाहरणे आहेत. असाच जीवघेणा प्रकार चीनी अभिनेत्री आणि गायिका गाओ लियू (Chinese actress and singer Gao Liu) च्या बाबतीत घडला आहे. कॉस्मेटिक सर्जरीमुळे तिला आपले सुंदर नाक गमावावे लागले आहे. गाओने नुकताच नाकाची कॉस्मेटिक सर्जरी केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गाओच्या नाकाचे टोक पूर्णपणे काळे पडले आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून अभिनेत्री आणि गायिका गाओ लियू बहुचर्चित सेलिब्रिटी म्हणून चीनमध्ये नावारुपास येत आहे. परंतु काही दिवस ती चीनी माध्यमातून गायब झाली होती. याबद्दल चीनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वीबोवर गाओ लियूने कॉस्मेटिक सर्जरीबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिच्या माध्यमातील अनुपस्थितीबद्दल माहिती दिली आहे. यात तिने कॉस्मेटिक सर्जिकल एक्सिडेंटला जबाबदार धरले आहे. या सर्जरीबद्दल सांगताना लियूने लिहिले की, ऑक्टोबर महिन्यात माझ्या एका मित्राने एका प्लास्टिक सर्जनसोबत भेट घडवून दिली. याच सर्जनकडून मी नाकाची सर्जरी करून घेतली. यावेळी तिच्या नाकावरील पेशींचा काही भाग काढून टाकण्यात आला. ज्यामुळे तिच्या नाकाला एक सुंदर आकार मिळेल असे तिला वाटले. नाकाच्या सुंदर शेपमुळे एक अभिनेत्री मी इतरांपेक्षा अधिक आकर्षक आणि सुंदर दिसेन, तसेच नाकाची विशेष ठेवण तिच्या करियरमध्ये तिला अधिक काम मिळवून देण्यात मदत करेल. असेही तिला वाटले. परंतु घडताना काही वेगळचं घडले. यासंपूर्ण सर्जरीमध्ये तिच्या नाकाला अधिक दुखापत झाली.

- Advertisement -

Gao Liu, a Chinese rising singer and actress, has warned about the dangers of cosmetic surgery by sharing pictures of…

Posted by ShanghaiEye on Thursday, 4 February 2021

लयूने आपल्या ५ मिलियन फॉलोवर्ससाठी या सर्जरीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या नाकाचे टोक हे काळे झाले आहे. चीनी सोशल मिडियावरही तिचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमुळे लियू तिचे चाहते सहानभूती देत असून कॉस्मेटिक सर्जरीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वीबोबर तिने लिहिले की, नाकावर करण्यात आलेली ही कॉस्मेटिक सर्जरी चार तास सुरु होती. याचदरम्यान माझ्या वाईट स्वप्नांनाही सुरुवात झाली होती. या सर्जरीनंतर मी अत्यंत वेदनादायी अनुभवातून जात होते. दरम्यान नाकाच्या टोकावरची त्वचा काळी पडली. तसेच आकारही बदलला. त्यामुळे मी माझे सुंदर नाक गमावून वसले आहे. परंतु हा गडद काळेपणा घालवण्यासाठी मला पुन्हा सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे ही जखम भरून काढण्यासाठी अजून कमीत कमी एक वर्ष लागू शकतो.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -