घरUncategorizedखुनासह जबरी चोरी करणार्‍या आरोपीला 19 वर्षांनंतर अटक

खुनासह जबरी चोरी करणार्‍या आरोपीला 19 वर्षांनंतर अटक

Subscribe

सातारा आंबेनळी घाटातील घटना

ट्रकमधील 9 लाख 31 हजार रुपयांचे समान लुटून ट्रकचालक आणि एका प्रवाशाला घाटात ढकलून ठार करणार्‍या एका आरोपीला तब्बल 19 वर्षानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. २००१ सालातल्या ऑगस्ट महिन्यात दोन तारखेला हा गुन्हा झाला होता.या दिवशी हमाम आणि लाईफबॉय साबणांनी भरलेला एकूण 9 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन एक ट्रक तामिळनाडू राज्यातून महाराष्ट्रात येत होता. हा ट्रक सातारा येथील आंबेनळी घाटात आला असताना मारुती कारमध्ये आलेल्या 4 अज्ञात इसमांनी ट्रकच्या पुढे कार उभी करून त्यांचा मार्ग रोखला. यावेळी आरोपींनी ट्रकचा ड्रायव्हर आणि 2 प्रवासी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून घाटात फेकून ठार मारले होते. ट्रकच्या क्लिनरने कसाबसा आपला जीव वाचवला होता. त्याने या संदर्भात कोयनानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

या घटनेतील 3 आरोपींना यापूर्वी कराड पोलिसांनी अटक करून त्यांना कराड सेशन कोर्टासमोर हजर केले होते. कोर्टाने त्यांना 7 वर्षे सक्त मजुरी आणि 500 रुपयांचा दंड ठोठावला होता.या गुन्ह्यातील चौथा आरोपी सुरेश भीमा गोरे (40) राहणार वसतगाव, तालुका कल्याण, हा गेल्या 19 वर्षांपासून फरार होता. हा आरोपी कर्जत येथील बस स्टँडजवळ येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष धाडवे, सुरेंद्र पवार, उदयकुमार पालांडे, पोलीस कर्मचारी रामचंद्र जाधव, बाबूलाल जाधव , दादासाहेब भोसले यांच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -