Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निलेश राणेंच्या त्या गौप्यस्फोटानंतर सोनू निगमची अजब प्रतिक्रिया

निलेश राणेंच्या त्या गौप्यस्फोटानंतर सोनू निगमची अजब प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

माजी खासदार निलेश राणे यांनी मध्यंतरी एका पत्रकार परिषदेत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हे सोनू निगमची हत्या करणार होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर आता सोनू निगमने प्रतिक्रिया दिली आहे. MTV Unplugged च्या सिझन आठच्या उदघाटनानंतर सोनू निगम माध्यमांशी चर्चा करत होता. यावेळी एका पत्रकाराने निलेश राणे यांनी केलेल्या आरोपावर सोनू निगमला त्याची प्रतिक्रिया विचारली, त्यानंतर सोनू निगमने असे काही उत्तर दिले की, पत्रकारांमध्येही एकच हशा पिकला…

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे हे आक्रमक वक्तव्य करण्यासाठी ओळखले जातात. शिवसेना खासदार विनायक राऊत यांना प्रत्युत्तर देण्याच्या नादात त्यांनी थेट ठाकरे घराण्यावरच आरोप केले. “ठाकरे कुटुंबिय आणि सोनू निगमचे नाते काय आहे”, हे सांगण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही निलेश राणे म्हणाले होते.

- Advertisement -