घरव्हिडिओबाजारपेठेत तुफान गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बाजारपेठेत तुफान गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Related Story

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटताच भुसावळच्या नागरिकांनी बाजारांमध्ये आज एकच गर्दी केली. जणू काही कोरोना नाहीच, असे दृश आज बाजारपेठेत पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही भुसावळ शहरात आहे. तर मुत्यूचे प्रमाण ही जास्त आहे. तरीही नागरिक बेफीकीर वागत आहेत. ब्रेक द चेनची नियमावली नागरिकांनी पायदळी तुडवल्याचे दृश पाहायला मिळाले. शहरातील भाजी मार्केटमध्ये आणि जामनेर रोडवरील भाजीपाला, फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी दिसून आली. काही नागरिकांसह विक्रेत्यांनी मास्क ही लावला नव्हता.

- Advertisement -