घरव्हिडिओदाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीला राज्य सरकारने वक्फ बोर्डावर घेतलं

दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीला राज्य सरकारने वक्फ बोर्डावर घेतलं

Related Story

- Advertisement -

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारची पुरती कोंडी केली असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आठव्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी नवा पेनड्राईव्ह सादर करत पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधात गौप्यस्फोट केला आहे. पेन ड्राईव्हमध्ये ऑडिओ क्लिप असल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिली. यातील संभाषणादरम्यान डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे दाऊदशी संबंध असून, डॉ. मुद्दस्सिर लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्डावरती घेतले आहे. दरम्यान, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलाय.

- Advertisement -