घरव्हिडिओधारावीत कोरोना रुग्णांसाठी योगासनाचा उपक्रम

धारावीत कोरोना रुग्णांसाठी योगासनाचा उपक्रम

Related Story

- Advertisement -
मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या धारावीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी खास योगा क्लासचे आयोजन केले जात आहे. राजीव गांधी क्रीडा संकुलात डॉ. धनंजय मोरे यांनी स्वतः रुग्णांना योगासने करून दाखवली. तसेच प्रत्येक आसनाचे महत्त्व सांगितले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना आजाराशी लढताना रुग्णांना त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. अशावेळी योगासने केल्या शारिरीक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यास मदत होते. तसेच मनातील नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक ऊर्जाही उत्पन्न होते.
- Advertisement -