घरव्हिडिओभिवंडीत गुन्हे शाखेच्या कारवाईत अवैध स्फ़ोटकांचा साठा जप्त

भिवंडीत गुन्हे शाखेच्या कारवाईत अवैध स्फ़ोटकांचा साठा जप्त

Related Story

- Advertisement -

ठाणे गुन्हे शाखा युनिट १ च्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवंडी कारवली गांव येथील मित्तल इंटरप्राइजेस च्या गोदामावर रात्री दीड च्या सुमारास अचानक धाड टाकली. जवळपास ६० खोक्यांमध्ये तब्बल १२ हजार जिलेटिनच्या कांड्या आणि ३००८ डेटोनेटर्स भरून ठेवलेले त्यांना आढळले. घटनेची माहिती मिळताच BDDS अर्थात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक देखील घटनास्थळी पोहोचले होते. हा सगळा माल अनधिकृतरित्या साठावण्यात आलेला असल्याने तो जप्त करून वाडा येथील सेफ हाऊस मध्ये ठेवण्यात आला आहे. ह्या प्रकरणी ५३ वर्षीय गुरुनाथ काशीनाथ म्हात्रे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २२मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -