घरव्हिडिओलॉकडाउनमुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांचे नुकसान

लॉकडाउनमुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांचे नुकसान

Related Story

- Advertisement -

कोरोना वैश्विक महामारीमुळे दोन महिन्याच्या लॉकडाउनमुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे द्राक्षांसाठी घेतलेल्या खते व औषध विक्रेत्यांची उधारी देणे शेतकर्‍यांना शक्य झाले नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडे औषध विक्रेत्यांचे सुमारे ४०० रुपये थकले आहेत. आधीची उधारी चुकती केल्याशिवाय नवीन औषधे देण्यास कंपन्यांनी नकार दिला आहे. त्यातच चीनबरोबरच्या तणावामुळे चीनमधून पिकांसाठीची औषधे, बुरशी नाशकांची आयात थांबणार असल्याने शेतकर्‍यांना इतर देशांमधील महागडी औषधे विकत घ्यावी लागणार आहे. एकंदरीत ८००० कोटींची उलाढाल, सव्वादोन हजार कोटींचे परकीय चलन मिळवून देणारा व सहा लाख लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार पुरवणार्‍या द्राक्षशेतीचे कसे होणार, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -