Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेना आमदारांशी संपर्क

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेना आमदारांशी संपर्क

Related Story

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून ५ तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण १० जागांवर निवडणूक होत आहे. शिवसेनेचे सोडल्यास राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपला आपल्या उमेदवार जिंकवण्यासाठी २७ मतांची गरज आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतांची संख्या जुळवण्यासाठी महाविकास आघाडीमध्येच फोडाफोडी सुरु झाली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे

- Advertisement -