घरव्हिडिओ'राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या भावनेसाठी निर्णय'

‘राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या भावनेसाठी निर्णय’

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश लवकरच काढण्यात येतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना वाढीस लागावी म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावण्यात येते. त्याचा दाखला देत सामंत यांनी महाविद्यालयातील राष्ट्रगीताच्या आवश्यकतेवर जोर दिला. येत्या आठवड्यात हा निर्णय लागू होण्याची शक्यता असल्याचं ही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -