घरव्हिडिओपोर्ट्रेटच्या माध्यमातून परिचारिकांना मानवंदना

पोर्ट्रेटच्या माध्यमातून परिचारिकांना मानवंदना

Related Story

- Advertisement -

जगात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. अशा कठीण स्थितीतही हजारो डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्राण संकटात घालून काम करत आहेत. अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे आणि काही परिचारिका सेवा बजावत असताना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याच्याही ऐकिवात आले आहे. आपला जीव धोक्यात टाकूनही आपलं रक्षण करण्यात डॉक्टर सक्रिय आहेत. स्टे होम स्टे सेफ च पालन करून आपणही त्यांना साथ देणं गरजेचं आहे. पवई येथे राहणारा चेतन राऊत या कलाकाराने सरकारच्या आदेशाचं पालन करून घरातच ज्यांनी या कोरोना विषयाच्या लढ्यात साथ दिली आहे. त्यांचे पोर्ट्रेट साकारले. डॉक्टरांसह परिचारिका यांना मानवंदना देण्यासाठी ६ रंगछटा असलेल्या ४ हजार २६६ पुशपिनचा वापर करून पोर्ट्रेट साकारलेले आहे. २४ इंच लांब व ३० इंच उंच हे पोर्ट्रेट आहे.

- Advertisement -