LockDown: ५०० किलोमीटर पायपीट केल्यानंतर महिलेने एका झाडाखाली दिला मुलीला जन्म!

लॉकडाऊनमुळे काम गेल्यामुळे ही महिला आपल्या गावी चालत जात होती. मात्र त्याच वेळेस तिला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या.

Woman migrant delivers baby girl under roadside tree after covering 500 kms on foot

देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. म्हणून लॉकडाऊन या तिसऱ्या टप्प्यात अनेक मजूर आपल्या राज्यात परतण्यासाठी पायपीट करत आहेत. अशाच एका गरोदर महिलने ५०० किलोमीटर पायपीट केल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बाळाला जन्म दिला आहे. उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात या २६ वर्षांच्या महिलेने रविवारी आपल्या बाळाला जन्म दिला आहे.

वृत्तानुसार, काम करत असलेला कारखाना लॉकडाऊनमुळे बंद झाल्यामुळे ही महिला अनेक लोकांसह मध्य प्रदेशातील धार येथून उत्तर प्रदेशकडे चालत निघाली होती. जेव्हा ती प्रवासाला निघाली तेव्हा ती साडेआठ महिन्यांची गरोदर होती. बऱ्याच दिवस चालत असल्यामुळे तिला बालाभेत गावात प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या.

तिचा नवरा तंतु याने सांगितले की, त्याची पत्नी प्रवासादरम्यान घेतलेल्या विश्रांतीच्या वेळी स्वयंपाक करीत होती. तेव्हा तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. मग तिने रस्त्याच्याकडेला असलेल्या एका झाडाखाली लहान मुलीला जन्म दिला. त्याच्या साथीदारांनी आणि इतर महिलांनी तिला मदत केली.

या महिलेची माहिती मिळताच बल्लभ गावाच्या प्रमुखांनी तिला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय पथकाला बोलावले. आई आणि नवजात मुलीला त्वरित या पथकाने वैद्यकीय मदत पुरविली आणि नंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले.

ललिपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रताप सिंह म्हणाले, आमचे वैद्यकीय पथक तेथे पोहोचण्यापूर्वी महिलेने एक स्वस्थ मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर आई आणि नवजात मुलीला वैद्यकीय सहाय्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. ते दोघेही आता सुखरुप असून रुग्णवाहिकेतून त्यांना गावी पाठवण्यात आले आहे.


हेही वाचा – एअर इंडियाचं विमान मलेशियातील १८० भारतीयांसह चेन्नईत दाखल