घरव्हिडिओमहापालिकेने उचलला डेब्रिज

महापालिकेने उचलला डेब्रिज

Related Story

- Advertisement -

कांदिवली पश्चिमेकडील चारकोप सेक्टर ८ येथील गृहनिर्माण सोसायटी जवळील मोकळ्या जागेत बांधकामाचे डेब्रिज टाकले जात होते. त्यामुळे परिसरात डेब्रिजचा ढीग तयार झाला होता. लॉकडाऊनच्या काळात पाच ट्रक डेब्रिज टाकण्यात आला होता. दरदिवशी एक ते दोन वाहने भरून डेब्रिज येथील मोकळ्या जागेत डम्पिंग केला जात होता. तसेच परिसरातील झाड ही मरत चालली आहे, असे येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच डेब्रिज माफियांवर ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु महापालिकेने आज येथील डेब्रिज उचलून टाकला आहे. नागरिकांच्या पाठपुराव्याला यश आले, असे म्हणायला वावगं ठरणार नाही.

- Advertisement -