घरमुंबईठाण्यातील उमेदवार अब्जाधीश आणि कोट्यधीश; जाणून घ्या उमेदवारांची मालमत्ता

ठाण्यातील उमेदवार अब्जाधीश आणि कोट्यधीश; जाणून घ्या उमेदवारांची मालमत्ता

Subscribe

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. मात्र यापैकी अनेक उमेदवार हे अब्जाधिश आणि कोट्याधीश असल्याचे त्यांनी सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झालं आहे. त्यानुसार या उमेदवारांच्या संपत्तीविषयी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एकनाथ शिंदे

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांची एकूण मालमत्ता ६ कोटी ४१ लाख रूपये आहे. २०१४ च्या निवडणुकीत ४ कोटी २४ लाख रूपये होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षात शिंदे यांची मालमत्ता २ कोटीने वाढली आहे. त्यांच्यावर ३ कोटी २० लाख रूपयांचे कर्जही आहे. तसेच त्यांच्याकडे आरमाडा स्कोर्पिओ आणि दोन इनोव्हा गाडया आहेत. तसेच पत्नीच्या नावे टेम्पो स्कॉर्पिओ आणि दोन इनोव्हा गाड्या तसेच ५८० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गाळा सदनिका आहेत.

- Advertisement -

प्रताप सरनाईक

ओवळा माजीवडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची एकूण मालमत्ता १२६ कोटी २९ लाख आहे. २०१४ च्या निवडणुकीत १६ कोटी ५० लाख होती. गेल्या पाच वर्षा १० पटीने वाढली आहे. त्यांच्याकडे टोयाटो लॅण्ड क्रुझर गाडी आहे. तसेच २५ तोळे सोन्याचे दागिने आहेत. पत्नीच्या नावे टोयोटा इनोव्हा, क्रिस्टा गाडया ५० तोळ्याचे दागिने आणि गाळा सदनिका आहे. काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांची मालमत्ता एकूण १ कोटी ५७ लाख आहे. त्यांच्याकडे एकही वाहन नाही. पत्नीच्या नावे ५७ तोळे सोन्याचे दागिने, हुंडाई आय २०, पिकअप टाटा एलपीके ९१२ जेसीबी, गाळा, सदनिका आहे.

संजय केळकर

ठाणे शहर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांची मालमत्ता ३ केाटी ४४ लाख रूपये आहे. २०१४च्या निवडणुकीत १ कोटी ४६ लाख होती. त्यांच्याकडे इनोव्हा क्रिस्टा ही गाडी असून त्यांच्या नावे १ कोटी रूपयाचे कर्ज आहे. त्यांच्याकडे साडेसहा तोळे सोने तर पत्नीच्या नावे २७ तोळे सोने चांदीचे दागिने आणि संयुक्त घर आहे.

- Advertisement -

अविनाश जाधव

मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांची एकूण मालमत्ता ४ कोटी ८३ लाख आहे. त्यांच्याकडे टोयाटो फॉच्र्युनर, मारूती सियाझ, बुलेट गाडी आहे. त्याचबरोबर २७० ग्रॅम १ कॅरेटचे डायमंड आहेत. पत्नीच्या नावे ४६० ग्रॅम सोन्याचे तर १२३० ग्रॅम चांदीचे दागिने, गाळा सदनिका, जमीन आहे.

रविंद्र चव्हाण

डोंबिवलीतील भाजपचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांची मालमत्ता ५ कोटी ३६ लाख रूपये आहे. २०१४ मध्ये ४ कोटी ५५ लाख होती. त्यांच्या नावे एकही गाडी नसून २१ लाखाचे सोने आहे. तसेच पत्नीच्या नावे जमीन शेअर्स सोने चांदी आहे. मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांची मालमत्ता एकूण १ कोटी ९७ लाख आहे. त्यांच्याकउे इनोव्हा गाडी आहे. पाच तोळे सोने आणि दीड किलो चांदी आहे. तसेच यांच्यावर २९ लाखाचे कर्ज आहे.

सुभाष भोईर

कल्याण ग्रामीण मतदार संघातील सेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांची एकूण मालमत्ता ८१ कोटी ६५ लाख आहे. २०१४ च्या निवडणुकीत २३ कोटी ७ लाख होती. पाच वर्षात चार पटीने वाढली आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज गाडी स्वत:च्या नावे २३ लाखाचे सोन्याचे दागिने तर पत्नीच्या नावे इनेाव्हा क्रिस्टल गाडी, सोन्याचे दागिने आणि जमीन आहे.

प्रमोद पाटील

मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांची एकूण मालमत्ता २२ कोटी २१ लाख रूपये आहे. त्यांच्याकडे लॅण्ड क्रूझर, होंडा सिटी, हायवा टीपर या गाडया आहेत. पत्नीच्या नावे इनोव्हा फोर्ड वाहने ५० तोळे सोने चांदी आदी आहेत.

गणपत गायकवाड

कल्याण पूर्वेचे भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांची एकूण मालमत्ता १२ कोटी ५२ लाख आहे. २०१४ च्या निवडणुकीत १७ कोटी ३३ लाख होती. आर्थिक मंदीचा फटका त्यांना बसलेला दिसतोय. त्यांच्याकडे मिर्सिडीज बेन्झ, तनल ट्रॅक्टर आहे. तसेच त्यांच्यावर १३ लाखांचे कर्जही आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे मर्सिडीज ब्रेण् ऑडी दुचाकी आहे.

किसन कथोरे

मुरबाडचे भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांची मालमत्ता एकूण १३ कोटी ८३ लाख रूपये आहे. २०१४ च्या निवडणुकीत ९ कोटी २० लाख होती. त्यांच्याकडे स्कार्पिओ कार आहे. १२१ तोळे सोने आणि पत्नीच्या नावे घर आहे.

प्रमोद हिंदुराव

राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांची मालमत्ता १५ कोटी रूपये आहे बीएमडब्ल्यू, स्विप्ट, इनोव्हा कार, जीप गाडया आहेत. ५२ तोळे सोने आणि १० तोळे चांदी आहे. पत्नीच्या नावे जमिनी, चार सदनिका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -