घरमहाराष्ट्रमोदी-पवारांमधला कलगीतुरा रंगणार; प्रचारसभेच्या तारखा जाहीर

मोदी-पवारांमधला कलगीतुरा रंगणार; प्रचारसभेच्या तारखा जाहीर

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेच्या तारखा भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोदी विरुद्ध पवार असा कलगीतुरा रंगताना दिसणार आहे.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक पक्ष प्रचाराच्या रणधुमाळीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांचे वेळापत्रक समोर आले आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर शरद पवार यांनी देखील राष्ट्रवादीच्या दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीच्या प्रचारसभांमध्ये शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी असा कलगीतुरा रंगणार आहे.

उद्यापासून शरद पवार यांचा प्रचार दौरा

शरद पवार यांचा उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून प्रचार दौरा सुरु होणार आहे. या प्रचार दौऱ्याचा पहिला टप्पा हा उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा असणार आहे, तर दुसरा टप्पा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असा असणार आहे. हे दोन्ही दौरे ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर १३ ऑक्टोबर पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या चार प्रचारसभा होणार आहेत.

- Advertisement -

शरद पवार यांच्या ८ ते १० ऑक्टोबर सभा

शरद पवार यांची पहिली सभा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्टोबर रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे सकाळी साडे अकरा वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा दुपारी ४ वाजता, दिनांक १० ऑक्टोबर रोजी हिंगणघाट सकाळी साडे दहा वाजता, बुटीबोरी-हिंगणा ३ वाजता, काटोल ५ वाजता ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या नऊ सभा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ प्रचारसभा महाराष्ट्रात होणार आहेत. मोदींची १३ ऑक्टोबर रोजी पहिली सभा होणार आहे. ही सभा जळगाव आणि विदर्भातील साकोले येथे होणार आहे. त्यानंतर १६ ऑक्टोबरला अकोला, परतूर, पनवेल येथे मोदींच्या सबा होणार आहे. १७ ऑक्टोबरला परळी, सातारा आणि पुणे येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत त्यांची शेवटची सभा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -