घरमहाराष्ट्रस्थिर सरकारसाठीच भाजप आजपर्यंत शिवसेनेसाठी थांबली - मुनगंटीवार

स्थिर सरकारसाठीच भाजप आजपर्यंत शिवसेनेसाठी थांबली – मुनगंटीवार

Subscribe

येत्या ९ नोव्हेंबरला विद्यमान सरकारचा कार्यकाळ समाप्त होत आहे. त्यामुळे जर ९ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन झाले नाही तर १० नोव्हेंबरपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप अल्प मताचे सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘स्थिर सरकार बसवण्याच्या दृष्टीनेच भाजपने आजपर्यंच शिवसेनेची वाट पाहिली आहे’, असे भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलते होते. आज भाजपचे वरिष्ठ नेते सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चौदा दिवस होऊन गेले. मात्र, अध्यापही राज्यात सरकार स्थापन झालेली नाही. भाजप आणि शिवसेनेने निवडणुकीपूर्वी युती जाहीर केली होती. मात्र, दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षांच्या मतभेदामुळे राज्यात अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही. येत्या ९ नोव्हेंबरला विद्यमान सरकारचा कार्यकाळ समाप्त होत आहे. त्यामुळे जर ९ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन झाले नाही तर १० नोव्हेंबरपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप अल्प मताचे सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय शिवसेनेसोबतच सरकार बनवावं हे भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – १४५ चा आकडा असलेल्यांनी दावा करावा; संजय राऊत यांचा भाजपला टोला

- Advertisement -

शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही

सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार स्थिर सरकार स्थापन होण्यासाठी भाजपला सरकारची निंतात गरज भासणार आहे. त्याचबरोबर आपली शिवसेनेसोबतही चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शिवसेनेकडून काही स्थरावर चर्चा सुरु आहे. पण प्रसामाध्यमातून जेव्हा पाहतो तेव्हा चर्चा सारी बंद आहे असे दिसते. पण चर्चा सुरु आहे. शिवसेनेसोबतच सरकार बनवावं हे भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे. अल्प मताचे सरकार भाजप बसवणार नाही. स्थिर सरकार बसवण्याच्या दृष्टीनेच भाजपने आजपर्यंच वाट पाहिली आहे’, असे मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -