घरमहाराष्ट्रबंडखोरांना त्यांची जागा दाखवणार; संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा इशारा

बंडखोरांना त्यांची जागा दाखवणार; संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा इशारा

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची मुदत संपल्यानंतर शिवसेना-भाजपच्यावतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये शिवसेना १२४ जागा, मित्रपक्ष १४ आणि उरलेल्या १५० जागा भाजप लढवत आहेत. “ज्या लोकांनी बंडखोरी करत अर्ज भरलेले आहेत. त्यांची समजूत काढून अर्ज मागे घ्यायला लावू. जर त्यांनी अर्ज मागे घेतले नाहीत. तर त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल, महायुतीच्या कोणत्याही पक्षात त्यांचे स्थान राहणार नाही”, असा धमकीवजा इशाराच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “सध्या महायुतीची चलती आहे. त्यामुळे सगळ्यानांच आमचे तिकीट हवे आहे. त्यामुळेच यादी जाहीर करण्यासाठी उशीर लागला. जागा वाटप करत असताना महायुतीमधील सर्वच पक्षांना तडजोड करावी लागली आहे. मात्र महायुतीसाठी आम्ही ती केली. युतीला राज्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल.”

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुद्दे – 

लोकसभेनंतर विधानसभेला युती होईल का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. मात्र आमची विचारधारा एक असल्यामुळे आम्ही युती केली.

लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली युतीला यश मिळाल्यानंतर राज्यातील जनतेचीच विधानसभेला युती व्हावी, ही इच्छा होती.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंचे मी विशेष स्वागत करतो. आता ते आमच्यासोबत विधानसभेत असणार आहेत. आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात मला शंका वाटत नाही. हे युवा नेतृत्व काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांच्या नेतृत्वाचा विजय होईल.

आमच्यामुळे माध्यमांना पुढेही बातम्या मिळतील. पण त्या सकारात्मक बातम्या असतील.

शिवसेना आणि भाजपची उमेदवार यादी पाहिली तर आम्ही निष्ठावंतांनाच उमेदवारी दिलेली आहे. काही ठिकाणीच बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे.

बंडखोरी झाली असली तरी आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ.

 

#Live: भाजप-शिवसेनेची सयुंक्त पत्रकार परिषद | बंडखोरीबाबत काय निर्णय घेणार?

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 4, 2019

 

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,

युती होईल की नाही? हा प्रश्न होता. तो आम्ही समजूतदारपणे सोडवला आहे. लहान भाऊ आणि मोठा भाऊ हा विषय बाजुला ठेवत आम्ही भाऊ आहोत हे मान्य केले आहे. न भांडता ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्या आम्ही करणार.

महाराष्ट्र घडवायचा असेल तर एकत्र काम करावे लागेल.

सिंधुदुर्गाबाबत एकत्र बसून मार्ग काढू

मुख्यमंत्री व्हावे, हे आदित्यचे स्वप्न नाही. तर महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करावे, हे त्याचे स्वप्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -