घरमुंबईधक्कादायक! ७० टक्के लहान मुलं मानसिक आजाराच्या विळख्यात

धक्कादायक! ७० टक्के लहान मुलं मानसिक आजाराच्या विळख्यात

Subscribe

बदललेल्या जीवनाच्या स्पर्धेत अनेक प्रकारच्या आव्हानांना प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. त्यात अभ्यासाचा वाढलेल्या ताण, त्यातून मुलांमध्ये जास्त गुणांसाठी असलेली स्पर्धा आणि दप्ताराचं ओझ अशा अनेक प्रश्नांवर आजही काम करणं गरजेचं आहे. कारण, मुलांना कमी वयातच नैराश्याशी सामना करावा लागत आहे. जवळपास ७० टक्के लहान मुलं मानसिक आजाराच्या विळख्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर, अशा मुलांना तणावापासून दूर करता यावं यासाठी आता शिक्षक पुढाकार घेणार आहेत. ४ ते १० ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य सप्ताह म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने समाजात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येते. यातच लहान मुलांमध्ये वाढलेला तणाव कमी करण्यासाठी पालिका शाळेत समुपदेशक नेमण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जाणार असून शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे देण्यात येत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं प्रमाण लक्षात घेता यंदाच्या वर्षी मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने हॉस्पिटलने विविध उपक्रमांचं आयोजन केलं. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी शालेय मानसिक आरोग्य या विषयात चर्चासत्र भरवलं होतं. यात मुंबईतील पालिका शाळेतील ४०० शिक्षकांना मानसिक आजाराबाबत माहिती देण्यात आली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमात विविध फलकं, लघुचित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताणामुळे वाढलेल्या आत्महत्येबाबत भाष्य केले जाईल.
– डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर हॉस्पिटल

- Advertisement -

मानसिक आजार म्हणजे काय? त्याच्यापासून कशी मुक्तता मिळू शकेल? याबाबतची प्रशिक्षण आणि माहिती पालिका शाळेतील शिक्षकांना असणं गरजेचं आहे. याच विचारातून पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये पालिका शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मानसिक आरोग्य सप्ताहादरम्यान नायर रुग्णालयातील मानसोपचार विभाग आणि इंडियन सायक्रॅटिक सोसायटीद्वारे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात पहिल्या दिवशी शालेय मानसिक आरोग्य या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. याद्वारे साधारणतः ४०० शिक्षकांना मानसिक आजारांबाबत मार्गदर्शन केलं गेलं.

“शाळेत जाणाऱ्या १० मुलांपैकी एका मुलामध्ये मानसिक आजाराशी संबंधित समस्या दिसून येते. यात नैराश्य, ताणतणाव आणि अभ्यासात मन न रमणं, अशी लक्षणं मुलांमध्ये आढळतात. जवळपास ७० टक्के लहान मुलांना कमी वयात मानसिक आजारांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे, या मुलांना मानसिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी शाळेतील शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. यासाठी मुंबईतील पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे देण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून विद्यार्थ्यांमधील नैराश्य शिक्षकांना पटकन ओळखता येणं शक्य होईल.” असंही डॉ. भारमल यांनी सांगितले.

- Advertisement -

शालेय मानसिक आरोग्य या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र भरवलं होतं. यात विद्यार्थ्यांमधील अभ्यासातील तणाव कसा ओळखावा? आणि मानसिक आजार म्हणजे नेमकं काय याबाबत शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात पालिका आणि खासगी शाळेतील ३०० ते ४०० शिक्षक सहभागी झाले होते.
– डॉ. हेमांगी ढवले, मानसोपचार विभागाच्या माजी प्रमुख आणि मानसोपचार तज्ज्ञ, नायर हॉस्पिटल

हेही वाचा –

भाजप-शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; खडसे, तावडे, मेहतांबाबत मुख्यमंत्री काय बोलणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -