घरमुंबईधारावीत सेंच्युरी ओलांडलेले सर्वाधिक मतदार; १३८ मतदारांची नोंद

धारावीत सेंच्युरी ओलांडलेले सर्वाधिक मतदार; १३८ मतदारांची नोंद

Subscribe

मुंबई जिल्ह्यातील विविध मतदारसंघात १०० हून अधिक वय असणाऱ्या एकूण १३६ मतदारांचा आकडा समोर आला आहे. सर्वाधिक वयोमानाचे मतदार हे धारावीत आढळले आहेत. पण काही कारणामुळे या मतदारापर्यंत पोहोचता आले नसल्याची माहिती मुंबई जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणुक अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली. जास्त वयोमानामुळे अनेकदा मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहचता येत नाही. पण आगामी कालावधीत नक्कीच यासाठीची मोहीम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

अनेक मतदार हे बिछान्याला खिळले आहेत, तर काही मतदारांच्या बाबतीत मतदान नोंदणी कार्ड तयार करताना जास्त वय सांगण्यात आले आहे. तर काही मृत मतदारांचा आकडाही यामध्ये समाविष्ठ असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा आकडा इतका दिसतो आहे. मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक वयोवृद्ध मतदार हे धारावीत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा

यंदा ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांसाठी ‘टुगेदर व्ही कॅन’ या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या व्हिलचेअरसाठी उपयुक्त अशा २० व्हिलचेअर पुरविण्यात येणार आहेत. तर जिल्हा निधीमधून ४०० नवीन व्हिलचेअर निवडणुकांसाठी खरेदी करण्यात आल्या आहेत. मुंबई जिल्ह्यात एकुण २४५७ मतदार हे दिव्यांग आहेत. पण लोकसंख्येच्या २ टक्के या प्रमाणात हे मतदार असण गरजेचे आहे. अनेक मतदारांनी आपल्या दिव्यांग स्थितीबाबत निवडणुक आयोगाला माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांची नोंद नसल्याचे जोंधळे यांनी सांगितले. दिव्यांग मतदारांसारखीच अनास्था ही तृतीयपंथी मतदारांच्या बाबतीत आढळली आहे. अनेकदा मतदार आपली ओळख लपवतात, असे आढळले आहे.

हेही वाचा –

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -